पुणे विद्यापीठात आजपासून मोफत सीएनजी बस सेवा सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून मुख्य प्रवेश द्वारापासून मोफत सीएनजी बस सेवा सुरू झाली आहे.
- पहिले तीन महिने ही बससेवा प्रायोगिक तत्त्वावर मोफत सुरू ठेवली जाणार आहे.
-सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत ही बस सेवा उपलब्ध असेल
- महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत सीएनजी बस विद्यापीठाला दिल्या आहेत. 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात आजपासून मुख्य प्रवेश द्वारापासून मोफत सीएनजी बस सेवा सुरू झाली आहे. पहिले तीन महिने ही बससेवा प्रायोगिक तत्त्वावर मोफत सुरू ठेवली जाणार आहे. त्यानंतर शुल्काबाबत विचार केला जाणार आहे. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत ही बस सेवा उपलब्ध असेल. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत सीएनजी बस विद्यापीठाला दिल्या आहेत. 

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यापीठाच्या आवारात विविध कामांसाठी येणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी ही मोफत बससेवा असेल. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली सीएनजी बसची सेवा सुरू करण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार विद्यापीठात सीएनजी बसचे थांबे निश्‍चित केले आहे.

 
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ही बस पर्यावरण विभाग चौकातून भौतिकशास्त्र, जयकर ग्रंथालय व अनिकेत कॅंटिन लगत थांबेल. नंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळून सी-डॅकपासून संगणकशास्त्र विभागापासून पुढे जात परीक्षा विभागाजवळ थांबेल. परीक्षा विभागात जाणाऱ्या प्रवशांना सोडून सेट-भवन, आंतराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रापासून मुख्य इमारतीजवळ थांबेल. नंतर विद्यापीठ आवारातील टपाल कार्यालय आणि मुलींच्या वसतीगृहाजवळ थांबून पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free CNG bus service started today at Pune University