मांजरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

मांजरी (पुणे) : साधना सहकारी बँकेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सभासदांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. 

मांजरी (पुणे) : साधना सहकारी बँकेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सभासदांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. 

पुढील महिनाभर हे शिबीर सुरू राहणार असून त्यामध्ये विविध चौदा आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. दरवर्षी बँकेच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात येत असते. त्यानिमित्ताने सभासदांना बँकेच्या 
वेगवेगळ्या उपक्रमांचीही माहिती देण्यात येते. राज्यात बँकेच्या 28 शाखा, 18 हजार 891 सभासद, सुमारे सव्वापाच कोटीचा नफा व लेखापरिक्षणासाठी अ वर्ग मिळालेला आहे. बँकेकडून पाॅज मशिन, शिशुबचत खाती, कोअर बँकींग सह विविध प्रकारच्या सेवा पुरविल्या जात आहेत. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश घुले यांनी दिली.

यावेळी सुकाणू समितीचे सदस्य दिलीप तुपे, चेतन तुपे, उपाध्यक्षा रोहिणी तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार पठारे, ज्येष्ठ संचालक सुरेश घुले, चंद्रकांत कवडे, अनिल तुपे, बबन मगर, प्रविण तुपे, दिनकर हरपळे, सुभाष काळभोर, डाॅ. एस. के. राऊत, वंदना काळभोर, संजय गुजर, हनुमंत कापरे, 
बाळासाहेब कोळपे, राजेश कवडे, शंकर बडदे, योगेश भगत, भाऊ तुपे, शंकर घुले आदी उपस्थित होते. यासह बँकेंचे सभासद कर्मचारी व हितचिंतक या कार्यक्रमास उपस्थित होते.

Web Title: free health check up in manjari