कोरोनाची लढाई या शस्त्रामुळे होणार सोपी... 

श्रीकृष्ण नेवसे
सोमवार, 13 जुलै 2020

या अत्याधुनिक मशीनद्वारे विविध २३ तपासण्या करण्याची सुविधा आहे. कोरोनाबाबत स्वॅब कोणाचे घ्यावेत वा न घ्यावेत, हे या मशीनद्वारे समजणार आहे. 

सासवड (पुणे) : कोरोना संशयित आहे का नाही, याबाबत थेट 23 प्रकारची तपासणी करून लगेच रिपोर्ट देणारे मशिन (बहुउद्देशीय शारीरिक तपासणी यंत्र) पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे. आमदार संजय जगताप यांनी हे मशीन प्रायोगिक तत्त्वावर सुरु केले. त्याच्या यशस्वीतेनंतर पुरंदर व हवेली तालुक्यात सहा ठिकाणी मशीन बसवून कोरोनाबाधीतांचा सहजपणे शोध घेतला जाईल, असा हा उपक्रम आहे.   

जुन्नरमधील नागरिकांवर दहा दिवस आहेत ही बंधने 

सासवड शहरातील कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या लांडगे आळीतील सर्व नागरिकांची 'क्लाउड क्लिनिक' या अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत आरोग्य तपासणी करण्याचे काम काल दुपारी सुरू झाले. या वेळी मशीन डेमो तत्वावर उपलब्ध करून देणारे आमदार संजय जगताप व नगरपालिका आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण व इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या अत्याधुनिक मशीनद्वारे विविध २३ तपासण्या करण्याची सुविधा आहे. यात वजन, उंचीसह शरीरातील तापमान, आॅक्सिजन व पाण्याचे प्रमाण, प्रोटिन्स, चरबी, हाडाची ठिसूळता, रक्तदाब, नेत्रस्थिती, कोणत्या घटकाची कमतरता, दोष आदी माहिती समजते. कोरोनाबाबत स्वॅब कोणाचे घ्यावेत वा न घ्यावेत, हे या मशीनद्वारे समजणार आहे. 

बारामतीकरांनो सावधान, आता तुमच्यासमोर आहे हो मोठा धोका...  

आमदार जगताप यांनी सांगितले की; प्रायोगिक तत्त्वावर सासवडच्या लांडगेआळीमध्ये ही मशीन कार्यान्वित झाली. पुढे शहरातील सगळे कन्टेन्मेंट झोनमधील काम उरकून उर्वरित सर्व नागरिकांची तपासणी होईपर्यंत मशीन येथेच राहील. या मशीनमधून तपासणी होणार्‍या प्रत्येक नागरिकाचा रिपोर्ट पालिकेत मेलवर व ज्याचा त्याला मोबाईल फोनवर मिळणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. या वेळी नगरसेवक अजित जगताप, नंदकुमार जगताप उपस्थित होते. 
 
Edited by : Nilesh Shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free health check-up through 'Cloud Clinic' machine at Saswad