सासवड येथे पाच ठिकाणी मोफत वाचनालये सुरु करण्यात येणार

श्रीकृष्ण नेवसे
गुरुवार, 3 मे 2018

साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवड (ता. पुरंदर) येथे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान संचलित आचार्य अत्रे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने विविध पाच ठिकाणी मोफत वर्तमानपत्र वाचनालये सुरु केली जात आहेत.

सासवड : येथील साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवड (ता. पुरंदर) येथे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान संचलित आचार्य अत्रे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने विविध पाच ठिकाणी मोफत वर्तमानपत्र वाचनालये सुरु केली जात आहेत. त्यापैकी पहिल्या वाचनालयाचा शुभारंभ श्री. छत्रपती शिवजयंती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राज्य कृषि परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते झाले. 

यावेळी आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे नियामक मंडळाचे सदस्य बंडुकाका जगताप, ग्रंथालयाचे संचालक चंद्रकांत टिळेकर, इब्राहिम सय्यद, दत्तात्रेय जाधव, दादा मुळीक, ग्रंथपाल नितीन यादव आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त कुंडलीक मेमाणे, बाळासाहेब जगताप, काळुतात्या जगताप, नारायण जगताप, राजाराम जगताप, बाळासाहेब शिवरकर, कुमार जगताप, विठ्ठल जगताप, किरण जगताप, संजय जगताप, अनिकेत जगताप आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडुकाका जगताप यांनी केले, तर आभार गौरव कोलते यांनी मानले. 

सभासद झाल्यास 7 हजार पुस्तकांचा लाभ

विजय कोलते म्हणाले, सर्वच क्षेत्रात ताजेतवाने राहावयाचे असेल तर दररोज किमान एक तरी वर्तमानपत्र वाचले पाहिजे. त्यासाठीच अत्रे ग्रंथालयाचा प्रयत्न आहे. मात्र, धार्मिक ठिकाणे, विविध मंडळे, गप्पांचे कट्टे, चौक, गल्ल्या येथे जमणाऱया लोकांमध्ये वाचनसंस्कृती वाढवी. यासाठी सार्वजनिक वर्तमानपत्र मोफत वाचनालये पाच ठिकाणी सुरु करीत आहोत. शिवाय अत्रे ग्रंथालयात कोणीही सभासद झाले तर त्यास सुमारे 7 हजार पुस्तकांचा लाभ घेता येईल.

Web Title: Free Libraries have started in five places at Saswad