
प्रत्येक आठवड्यातील 5 दिवसांच्या कार्यक्रमासाठी सुमारे 40 उमेदवारांची एक तुकडी याप्रमाणे सारथीचा अनिवासी प्रशिक्षण वर्ग पूर्णतः मोफत आहे.
पुणे : मराठा, कुणबी समाजातून नॉन क्रिमीलेअर गटाच्या उमेदवारांकरिता सारथीतर्फे 5 दिवसीय 'आयात निर्यात' व्यवस्थापन वर्ग पुणे येथे मोफत आयोजित करण्यात येते आहे. या प्रशिक्षणाचा पहिला वर्ग 18 नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतरची दुसरी बॅच चालू आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
आयात आणि निर्यात व्यवसायाची व्यापकता आणि त्यात असणाऱ्या सेवा व मालमत्ता क्षेत्रांच्या संधीचे महत्त्व लक्षात घेता सारथीद्वारे मराठा, कुणबी समाजातील नॉन क्रिमीलेअर गटातील उमेदवारांकरिता नावीन्यपूर्ण असा अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम विशेषज्ञ, कुशल व अनुभवी व्यक्तींद्वारे तयार केला आहे.
- शास्त्रज्ञांना सापडला तब्बल 18 हजार वर्षे जुना श्वान
भारतातील सेवा आणि वस्तू विदेशात निर्यात करणे तसेच विदेशातील सेवा व वस्तू भारतात आयात करण्याकरिता देश विदेशातील व्यवसायासंबंधातील कायदे, तेथील बॅंकांचे नियम, कस्टम, लॉजिस्टिक, आरबीआय इ. संस्थांचा असणारा सहभाग अशा अनेक विषयासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे.
- दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!'
प्रत्येक आठवड्यातील 5 दिवसांच्या कार्यक्रमासाठी सुमारे 40 उमेदवारांची एक तुकडी याप्रमाणे सारथीचा अनिवासी प्रशिक्षण वर्ग पूर्णतः मोफत आहे. या प्रशिक्षणांतर्गत दुपारचे भोजन व दोन वेळचा चहा मोफत दिला जातो. सारथीच्या या अनिवासी प्रशिक्षणाच्या संधीचा पात्र उमेदवारांनी फायदा घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक डी. आर. परिहार यांनी केले आहे.
- सभात्यागासाठी भाजपला निव्वळ निमित्त हवं होतं
ऑनलाइन अर्जासाठी https://sarthi-maharashtragov.in>NoticeBoard>EXPORT-IMPORT लिंकवर अर्ज करता येतो. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुणे येथे ऍडव्हान्स प्रशिक्षण देण्याचा सारथीचा विचार आहे. त्याअन्वये सुमारे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल.