पारुंडेच्या ब्रह्मनाथ विद्यालयात स्कूल बॅगचे मोफत वाटप

दत्ता म्हसकर
मंगळवार, 10 जुलै 2018

जुन्नर - पारुंडे (ता. जुन्नर) येथील श्री ब्रह्मनाथ विद्या मंदिरात इयत्ता पाचवीत नवीन प्रवेश घेतलेल्या 65 विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे मोफत वाटप करण्यात आले.

कै.शांताबाई गायकवाड यांचे स्मृतिप्रित्यर्थ गायवाड कुटुंबियांनी मुलांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यालयात एस्.एस्.सी. परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांच्या 100 पट रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. यावर्षी वैष्णवी मंगेश चव्हाण - ९०४० रुपये साक्षी संजय पवार - ८९०० रुपये, ओंकार शरद खुळे - ८६६० रुपये यांना बक्षिसाची रक्कम देण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ब्रह्मनाथ सेवा मंडळाचे उपाध्यक्ष अविनाश पुंडे यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी किसन गायकवाड, प्रतिभा चाळक, ऐश्वर्या चाळक, माजी सचिव दिगंबर पुंडे, सरपंच सुमित्रा पवार, उपसरपंच प्रवीण पवार, जयेश पुंडे, सल्लागार मेघनाथ जाधव, सदस्य प्रियांका पवार, प्रदीप पवार, मुख्याध्यापक भगवान जुन्नरकर तसेच पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

पर्यवेक्षक फकीर आतार यांनी प्रास्तविक व स्वागत केले. धनंजय राजूरकर सूत्रसंचलन यांनी केले व आभार अंजाभाऊ तांबडे यांनी मानले.

Web Title: free school bags distribution in parunde brahmanath school