खूशखबर ! या रुग्णालयात होणार मोफत शास्त्रक्रिया व मोफत औषधोपचार

डी के वळसे पाटील
Monday, 29 June 2020

मंचरच्या गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व्यक्तींच्या मोफत शास्त्रक्रिया व मोफत औषधोपचार

मंचर : येथील गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या केशरी, पिवळे व अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबातील व्यक्तींना मोफत लाभ मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया व औषधोपचार मोफत केले जातील, अशी माहिती गेटवेल  हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. भूषण मोहन साळी यांनी दिली आहे. आंबेगाव तालुक्यात अशा पद्धतीची योजना राबविणारे खासगी गेटवेल हॉस्पिटल पहिले ठरले आहे. या योजने अंतर्गत अपेंडिक्स, पित्ताशयाची पिशवी काढणे, हार्निया रिपेयर दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची पिशवी काढणे, गर्भ पिशवी वर उचलून घेणे, पी.सी.ओ.डीसाठी 
ओव्हरिअन ड्रीलिंग प्रोस्टेट, दुर्बिणीद्वारे मुतखडा काढणे, दुर्बिणीद्वारे सांध्याची तपासणी व निदान, सांधे बदलणे, मणका, मेंदू आदी व इतर शस्त्रक्रिया केल्या जातील. तसेच, सर्पदंश, विषबाधा, मधुमेह, हार्टअटॅक, पॅरालिसीस, उच्चरक्तदाब याच्यावर ही उपचार केले जातील.
-----------
'या' देशाचा भारताला पाठिंबा; हिंद महासागरामध्ये केला एकत्रित युद्धसराव
-----------
सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा
-----------
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम नोंदणी आवश्यक आहे. रूग्णांनी पिवळे व केशरी रेशनकार्ड व आपल्या आजारा संबंधीत जुने रिपोर्ट देणे गरजेचे आहे. हॉस्पिटलमध्ये अस्थीरोग विभाग, आय.सी.यु.व जनरल मेडिसिन स्त्रीरोग प्रसूती विभाग, नवजात अतिदक्षता विभाग, जनरल सर्जरी, युरो सर्जरी तज्ञ, अर्भकासाठी कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणा, व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे.

गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केशरी, पिवळे व अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या गर्भवती मातांची या हॉस्पिटल मध्ये नॉर्मल डीलेवरी व सिझेरियन डीलेवरी (ता. ३१ जुलै) पर्यंत मोफत केली जाणार असल्याचेही स्त्रीरोग तज्ञ डॉ. मोहन साळी यांनी सांगितले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free surgery and medicine for Poor people at Getwell Multispeciality Hospital in Manchar

Tags
टॉपिकस
Topic Tags: