खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे तीन बालकांवर हृदयाची मोफत शस्त्रक्रिया

राजकुमार थोरात
बुधवार, 2 मे 2018

वालचंदनगर (पुणे) : खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे इंदापूर तालुक्यातील तीन बालकांवरती हदयाची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आराेग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली. 

इंदापूरमध्ये बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने एल. रहेजा हॉस्पिटल संचालित फोर्टीज ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आणि मेंटोर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने 23 मार्च  रोजी 0 ते 15 वयोगटातील मुलांसाठी मोफत ह्रदयरोग शस्त्रक्रिया व तपासणी शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे १०० बालकांची तपासणी करण्यात आली.

यातील १५ बालकावरती अवघड शस्त्रक्रिया करण्याचे गरजेचे होती. यातील ईश्वरी मासाळ, जान्हवी होळकर, शिवम साळुंखे या बालकावरती शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. या शस्त्रक्रियेसाठी प्रत्येकी 2 ते 3 लाख रुपयापेक्षा जास्त खर्च आला असता. उर्वरित 12 बालकांवरती ही पालकांच्या सोईनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार अाहेत. तसेच सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातुन पुणे जिल्हामध्ये विविध आराेग्याचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे झेडपी अारोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले. 
 
Web Title: free surgery on child helped by mp supriya sule