...अखरे लोहगावकरांना पंपिंग स्टेशनवर मोफत पाणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

येरवडा - लोहगावमध्ये आठवड्याला एकदा पिण्याचे पाणी मिळत असताना येथील पंपिंग स्टेशनवर 25 पैसे प्रतिलिटरप्रमाणे पिण्याचे पाणी मिळत होते. मात्र, "सकाळ'मध्ये ही बातमी प्रसिद्ध होताच बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाने पंपिंग स्टेशनवर मोफत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे लोहगावकरांनी स्वागत केले आहे. 

येरवडा - लोहगावमध्ये आठवड्याला एकदा पिण्याचे पाणी मिळत असताना येथील पंपिंग स्टेशनवर 25 पैसे प्रतिलिटरप्रमाणे पिण्याचे पाणी मिळत होते. मात्र, "सकाळ'मध्ये ही बातमी प्रसिद्ध होताच बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाने पंपिंग स्टेशनवर मोफत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे लोहगावकरांनी स्वागत केले आहे. 

लोहगाव पंपिंग स्टेशनवर नागरिक कॉईन मशिनमध्ये पाच रुपये टाकून वीस लिटर पाणी भरत होते. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी सकाळी सहापासून रात्री उशिरापर्यंत लोहगावकर पाणी भरण्यासाठी गर्दी करीत होते. महापालिकेच्या हद्दीत इतरांना मुबलक व पुरेशा दाबाने पाणी तर येथे पैसे का, असा प्रश्‍न येथील नागरिकांनी केला होता. तर, नगरसेवक ऍड. अविनाश साळवे यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांच्याकडे लोहगावकरांना पाणी मोफत देण्याची मागणी केली होती. कुलकर्णी यांनी बंडगार्डन पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता दत्तात्रेय तांबारे यांना याबाबत निवदेन देण्यास सांगितले होते. त्यानंतर येथील पंपिंग स्टेशनवर मोफत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी तांबारे यांना केली. 

लोहगावातील पंपिंग स्टेशनवरील कॉईन बॉक्‍स काढल्यास सार्वजनिक नळासारखी स्थिती होईल. या ठिकाणी पाणी भरण्यासाठी भांडणाचे प्रकार घडतील व पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी योग्य ती उपाययोजना करून लोहगावकरांना मोफत पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येईल. 
- दत्तात्रेय तांबारे, कनिष्ठ अभियंता, बंडगार्डन पाणीपुरवठा विभाग 

आता शुद्ध पाणी मिळेल 
लोहगावात बोरिंग व विहिरीच्या पाण्याची पाच रुपयांत वीस लिटरप्रमाणे विक्री होते. मात्र, आता लोहगाव पंपिंग स्टेशनवर लोहगावकरांना महापालिकेचे शुद्ध पाणी मोफत मिळणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लोहगावातील वाड्या- वस्त्यांमधील नागरिकांची पाण्याची मोठी सोय होणार आहे.

Web Title: Free water at the lohegaon pumping station