मुस्लिम स्त्रियांचे स्वातंत्र्य महत्त्वाचे - देशमुख 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे - ""शाहाबानोप्रकरणी जी चूक केली, ती सुधारण्याची संधी प्रस्तावित केलेल्या तिहेरी तलाक विधेयकाच्या निमित्ताने पुन्हा आली आहे. कायदा कोणी आणला हे महत्त्वाचे नसून मुस्लिम स्त्रियांचे स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. या निमित्ताने पुरोगामी कोण हेदेखील कळेल,'' असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी गुरुवारी व्यक्त केले. 

नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात हमीद दलवाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त साधना प्रकाशन व हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. दलवाई यांच्या भगिनी फातिमा महंमद खडस, कन्या इला दलवाई-कांबळी, हीना कौसर खान आणि मोहीब कादरी उपस्थित होते. या वेळी खडस यांचा विशेष गौरव करण्यात आला. हीना कौसर खान लिखित "तीन तलाक पाच महिला' आणि मोहीब कादरी लिखित "आठवणी जुन्या, शब्द नवे' या पुस्तकांचे प्रकाशन झाले. दलवाई यांच्या "ब्राह्मणांचा देव' आणि "छप्पर' या लघुकथांचे अक्षय वाटवे आणि वंदना बोकील-कुलकर्णी यांनी अभिवाचन केले. 

देशमुख म्हणाले, ""तोंडी तिहेरी तलाक आणि हलाला हे धर्मसंमत नसून मुस्लिम स्त्रियांसाठी अन्यायकारक आहे. तिहेरी तलाकबाबतचे विधेयक लोकसभा व राज्यसभेच्या मान्यतेनंतर उच्चस्तरीय समितीकडे प्रलंबित आहे. शिक्षेबद्दलच्या आक्षेपांवर पुनर्विचार करून हा कायदा अमलात आणला पाहिजे. यानिमित्ताने राजकीय पक्षांपैकी कोण पुरोगामी हे कळू शकणार आहे. मुस्लिम समाजासह देशातील नागरिकांनी हा कायदा संमत करण्यासाठी दबाव टाकला पाहिजे.'' 

हमीद दलवाई यांनी 1957 मध्ये तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्वाविरोधात सात बायकांचा मोर्चा काढला होता. त्या वेळी मी बहीण म्हणून भावाच्या पाठीशी उभी होते. मुस्लिमांना शत्रू आणि देशहिताआड येणारा घटक म्हणून भासविले जात आहे. 
- फातिमा खडस 

Web Title: Freedom of Muslim women is important