वाघोलीकर म्हणताहेत, वर्क फ्रॉम होम, आॅनलाइन अभ्यास करायचा कसा?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

वाघोली व परिसरात महावितरणचा वीज पुरवठा दिवसातून अनेकवेळा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. वाढीव वीज बिले मिळत असल्याचीही नागरिक तक्रार करत आहेत.

वाघोली (पुणे) : वाघोली व परिसरात महावितरणचा वीज पुरवठा दिवसातून अनेकवेळा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. वाढीव वीज बिले मिळत असल्याचीही नागरिक तक्रार करत आहेत. सध्या अजूनही अनेकजण वर्क फ्रॉम होम करीत आहेत. तर शालेय मुलांचाही ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. दिवसात 8 ते 10 वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना अडचण होते.

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

याबाबत नागरिक इमेल, ट्विटर, व्हाट्सअप याद्वारे महावितरण, आमदार, लोकप्रतिनिधी यांना तक्रार करीत आहेत. सध्या पावसानेही दडी मारल्याने उकाडा जाणवत आहे. खंडित वीज पुरवठ्यामुळे हा त्रास अधिक जाणवतो. खंडित वीज पुरवठ्याची समस्या दूर करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचे एेकूनच आला हार्ट अॅटॅक

याबाबत हडपसर ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अमित भरते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मागील चक्री वादाळामुळे अनेक बिघाड झाले आहेत. ते दुरुस्त केले आहेत. मात्र अनेक ठिकाणी अचानक जोड तुटणे व अन्य समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्या दुरुस्तीसाठी वीज पुरवठा खंडित होतो. आम्ही सर्व वाहिन्यांचेही सर्वेक्षण केले आहे. मात्र, काही ठिकाणची छोटी समस्या लक्षात येत नाही. त्यात बिघाड झाल्यानंतर ते समजते.

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ

सध्याची कर्मचारी संख्या आणि कामाचा ताण भरपूर असल्याने दुरुस्तीसाठी थोडा वेळ लागतो. किमान 100 कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ सध्या 30 कर्मचारी आहेत. वाघोलीतील चोखीधानी परिसरात स्वतंत्र सब स्टेशनला परवानगी मिळाली आहे. मात्र त्याचे काम अद्याप सुरू झाले नाही. ते झाल्यास अशी समस्या उद्भवणार नाही. सध्याच्या कोरोना परिस्थितीत मंजुरी, निधीचा विचार करता नवीन कामे होण्यास वेळ लागेल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन भरते यांनी केले.

नगरसेवक दत्ता साने यांच्यासारखा झुंजार सहकारी गमावला : अजित पवारांची श्रद्धांजली

Image may contain: one or more people, people standing and outdoor

 

वीज बिले वाढीव मिळत असल्याची नागरिकांची तक्रार असल्याने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी वाघोलीच्या अभियंता श्रीखंडे यांची भेट घेऊन वाढीव वीज बिल माफ करावे अशी लेखी विनंती केली. या प्रसंगी बी जे पीचे  जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे, शरद आव्हाळे , प्रदीप सातव, विजय जाचक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Frequent power outages in wagholi