माणसाच्या चैनीचा नाद अन् सापांच्या गळ्याला फास

snake.jpg
snake.jpg

मारुंजी (पुणे)  : पुण्यातील चांदखेड, बेबड ओव्हळ या दोन गावाच्या दरम्यानच्या परिसरातून धामण जातीच्या सापाचे तोंड अॅल्युमिनियमच्या कॅनमध्ये अडकलेल्या परिस्थितीमध्ये आढळून आला. प्राणीमित्रांनी या सापाची सुखरुप सुटका केली. 

पिंपरी चिंचवड मधील वाईल्ड अॅनिमल्स स्नेक प्रोटेक्शन सोसायटीच्या हद्दी लगत असलेल्या चांदखेड, बेबड ओव्हळ या दोन गावाच्या दरम्याच्या परिसरातून विशाल माळी यांना जाताना धामण जातीच्या सापाचे तोंड अॅल्युमिनियमच्या कॅनमध्ये अडकलेल्या परिस्थितीमध्ये आढळून आला. यांच्यासह रुग्ण असताना त्यांनी माणुसकी दाखवत तातडीेने प्राणीमित्र संघटनेचे सदस्य शेखर जांभुळकर यांना फोन करून त्या सापाचा फोटो आणि लोकेशन पाठवले.


प्राणीमित्र तुषार पवार, नितीन, दीपक कांबळे यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या सापाचा खूप वेळ शोध घेतला. अखेर त्यांच्या प्रयत्नाना यश आले. त्या सापाला सुखरूप मारुंजी येथे आणून त्या धामणीला नेले. प्राणिमित्र गणेश भूतकर यांच्यासह सर्वांनी अवश्यक्तेनुसार आणि सुरक्षित वस्तूंचा वापर करत कुठलीही इजा न होऊ देता सापाची यशस्वी सुटका केली. 

''माणसांचा व मानव निर्मित वस्तूंचा खूप त्रास निसर्गाच्या कुशीत जगत असणाऱ्या अनेक प्राण्यांना भोगावा लागत आहे. याचा कुठे तरी विचार व्हायला हवा. अश्या परिस्थितीला आळा घालण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपण आपल्या परिसरात काम करत आहोत.'' , असे मत मांडताना गणेश भूतकर यांनी त्यांचा नंबर (९९७०६६८८८६) शेअर केला आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com