अडीच हजारांसाठी केला मित्राचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

एचए मैदानावरील खुनाचा उलगडा करण्यास पिंपरी पोलिसांना यश आले असून, अडीच हजारांसाठी मित्रानेच डोक्‍यात दगड घालून खून केल्याची कबुली आरोपीने दिली.

पिंपरी -  एचए मैदानावरील खुनाचा उलगडा करण्यास पिंपरी पोलिसांना यश आले असून, अडीच हजारांसाठी मित्रानेच डोक्‍यात दगड घालून खून केल्याची कबुली आरोपीने दिली.

आकाश दिनकर राऊत (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. अजय राजेश नागोसे (वय १९, दोघेही रा. गांधीनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. अजयचा मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. मृतदेहाजवळ मिळालेल्या मोबाईलवरून त्याची ओळख पटली. सीसीटीव्ही तपासले असता आकाश हा घटनेच्या वेळी अजयसोबत असल्याचे समोर आले.

Web Title: friend murder in pimpri

टॅग्स