बिबट्या सोबत मैत्रीचा आगळा वेगळा फ्रेंडशिप डे

दत्ता म्हसकर
रविवार, 5 ऑगस्ट 2018

जुन्नर : आज सर्वत्र फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात व आनंदात विविध शुभेच्छाच्या वर्षावात साजरा होत असताना माणिकडोह जुन्नर येथील बिबट निवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मैत्रीचा आगळा वेगळा फ्रेंडशिप डे साजरा केला.

निवारा केंद्रातील पस्तीस बिबट्या सोबत काम करत असताना त्याच्या सवयी, जेवण वेळ, खेळणे या सर्व बाबी पाहत, कुठे ना कुठे त्यांच्याशी कर्मचाऱ्यांचे एक नात निर्माण होत. ते आजारी पडल्यानंतर काळजी वाटते. अशावेळी बिबट सुद्धा त्यांच्याकडे आपुलकीने पहातात. रोज सोबत असणारे हे मित्र लळा लावतात. 

आज त्यांना हॅपी फ्रेंडशिप डे म्हणतांना आमची टीम अत्यंत आनंदी असल्याची भावना येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी व्यक्त केली. कोणतीही अपेक्षा न बाळगता आपलं म्हणणारा मित्र मिळाला हेच समाधान बिबटा निवारा केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर या दिनाच्या निमित्ताने दिसून येत होते.
 
Web Title: Friendship day is celebrated with Leopard,