सोशल मीडियावर बरसली मैत्रधार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुणे - ‘मैत्री एक अनमोल भेट जीवनाची, मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची...’ अशा शब्दांची गुंफण करीत रविवारी तरुणाईने मैत्री दिनाच्या आपल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या. कोणी छायाचित्रांच्या कोलाजमधून, तर कोणी फेसबुकवर मित्रांबद्दल व्यक्त होत ‘फ्रेंडशिप डे’निमित्त मित्र-मैत्रिणींच्या आठवणीत रमले. सोशल नेटवर्किंग साइट्‌ससह काहींनी आपल्या मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटून मैत्री दिन साजरा केला. तर, काहींनी सामाजिक उपक्रमात सहभाग घेत आगळे-वेगळे सेलिब्रेशन केले. कविता, चारोळ्या, छायाचित्रे, व्हिडिओ, फेसबुक-इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे मित्र-मैत्रिणींनी मैत्रीच्या नात्याची अनोखी गुंफण केली.

पुणे - ‘मैत्री एक अनमोल भेट जीवनाची, मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची...’ अशा शब्दांची गुंफण करीत रविवारी तरुणाईने मैत्री दिनाच्या आपल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या. कोणी छायाचित्रांच्या कोलाजमधून, तर कोणी फेसबुकवर मित्रांबद्दल व्यक्त होत ‘फ्रेंडशिप डे’निमित्त मित्र-मैत्रिणींच्या आठवणीत रमले. सोशल नेटवर्किंग साइट्‌ससह काहींनी आपल्या मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटून मैत्री दिन साजरा केला. तर, काहींनी सामाजिक उपक्रमात सहभाग घेत आगळे-वेगळे सेलिब्रेशन केले. कविता, चारोळ्या, छायाचित्रे, व्हिडिओ, फेसबुक-इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे मित्र-मैत्रिणींनी मैत्रीच्या नात्याची अनोखी गुंफण केली. पावसाच्या हलक्‍याशा सरींनी हा दिवस आणखी बेस्ट बनवला.

ट्विटर, व्हॉट्‌सॲप, हाइक, इन्स्टाग्राम आणि फेसबुक वॉलवर मैत्रीचे नाते अधिक घट्ट करीत, तर काहींनी मैत्रीचे नाते घट्ट बांधणारे ‘फ्रेंडशिप बॅंड’ बांधत हा दिन सेलिब्रेट केला. पावसाच्या सरी आणि त्यात आउटिंगला बाईकवर  मित्र-मैत्रिणींसोबत जाऊन अनेकांनी मैत्रीचा दिन खास बनवला. लहान मुलांनी आपल्या फ्रेंड्‌सना फ्रेंडशिप बॅंड बांधत, तर ज्येष्ठ नागरिकांनी सोशल नेटवर्किंग आणि प्रत्यक्ष भेटून मित्र-मैत्रिणींशी जुन्या आठवणींना उजाळा देत निखळ मैत्रीचे बंध पुन्हा एकदा जोडले.

फ्रेंडशिप बॅंडची क्रेझ कमीच
एकमेकांना बॅंड बांधत, सेल्फी काढत आणि प्रत्येक क्षण छायाचित्रात बंदिस्त करीत मित्र-मैत्रिणींनी फ्रेंडशिप डेचे सेलिब्रेशन केले. मित्र- मैत्रिणींसोबत घालविलेले क्षण आणि त्यांच्यासोबत मज्जा-मस्ती करतानाचे छायाचित्रही अनेकांनी पोस्ट केले. यंदाच्या मैत्री दिनाला फ्रेंडशिप बॅंडची क्रेझ कमीच होती.  

Web Title: Friendship Day Social media