बेकायदेशीर खडी वाहन चालकांसाठी ठरतेय डोकेदुखी

विजय मोरे
सोमवार, 25 जून 2018

उंडवडी : बारामती - पाटस रस्त्याने ट्रकमध्ये होत असलेली खडीची वाहतूक वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरु लागली आहे. खराडेवाडी, उंडवडी सुपे हद्दीतील रस्त्यावर ट्रकमधून खडी रस्त्यावर पडत असल्याने दुचाकीस्वार घसरुन पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

उंडवडी : बारामती - पाटस रस्त्याने ट्रकमध्ये होत असलेली खडीची वाहतूक वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरु लागली आहे. खराडेवाडी, उंडवडी सुपे हद्दीतील रस्त्यावर ट्रकमधून खडी रस्त्यावर पडत असल्याने दुचाकीस्वार घसरुन पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

वासुंदे ( ता. दौंड) हद्दीत अनेक खडी क्रेशरचे उद्योग वाढले आहेत. याठिकाणी ट्रक छोटी व मोठी खडी भरुन खराडेवाडी व उंडवडी सुपे मार्गे मोठ्या प्रमाणावर बारामतीकडे जात आहेत. अनेकदा खडीचे ट्रक अधिक प्रमाणात भरुन उघड्यावरुन वाहतूक करत आहेत. त्यामुळे अनेकदा दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जात असल्याचे प्रकारही घडत आहेत. तसेच ट्रकमधून खडी रस्त्यावर पडण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसात खराडेवाडी हद्दीतील रस्त्यावर ठिकठिकाणी खडी पडल्याने चार ते पाच दुचाकीस्वार घसरुन पडल्याने छोटे - मोठे आपघात घडले आहेत. यमध्ये दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

बेकायदेशीर मार्गाने काढत असलेल्या वाळू उपशावर सर्वत्र प्रशासनाने कडक कारवाईचे हत्यार उपासल्याने दगडापासून बनवलेल्या बारीक क्रॅश सॅंडला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे खडी क्रेश उद्योगाला सुगीचे दिवस आल्याने रस्त्यावर खडी वाहतुकीचे ट्रक वाढले आहेत. बेकायदेशीरपणे होत असलेल्या खडी वाहतूकीला प्रशासनाने चाप देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

याबाबत खराडेवाडीचे सरपंच दत्तात्रेय खराडे म्हणाले, "आम्ही अनेकदा खडी वाहतूक ट्रक चालकांना तोंडी सूचना दिल्या आहेत. मात्र ट्रक चालक कोणतेही वाहतुकीचे नियम न पाळता अधिक प्रमाणात खडी भरुन उघड्यावरुन घेवून जात आहेत. आत्ता आम्ही बारामतीच्या आरटीओकडे लेखी स्वरुपात तक्रार करुन बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाईची मागणी करणात आहोत. "

Web Title: Frustrating headaches for illegal road drivers