वाढीव एफएसआयचा ५० ‘एसआरए’ प्रकल्पांना फायदा

SRA-Project
SRA-Project

पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या नव्या नियमावलीची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी शहरात सुरू असलेल्या सुमारे ५० एसआरए प्रकल्पांना त्याचा फायदा मिळणार आहे.

राज्य सरकारकडून जानेवारी २०१८ मध्ये एसआरएसाठी प्रोत्साहनपर नियमावलीचे प्रारूप लागू करण्यात आले. त्यात ‘एफएसआय’मध्ये वाढ होण्याऐवजी आणखी कपात झाली. राज्य सरकारने नियमावलीत बदल करीत अंतिम नियमावली लागू केली आहे. त्यामध्ये तीनपर्यंत ‘एफएसआय’ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या एसआरएच्या बांधकाम प्रकल्पांनादेखील तो लागू करण्याची तरतूद त्यामध्ये करण्यात आली आहे.

त्यामुळे २०१४ च्या नियमावली नुसार जे प्रकल्प मंजूर झाले आहे, परंतु पूर्ण झालेले नाहीत अशा बांधकामांना फेरप्रस्ताव दाखल करून या नियमावलीचा फायदा घेता येईल.

राज्य सरकारने नव्याने बांधकाम नियमावली मंजूर केली आहे. त्याचा फायदा सध्या सुरू असलेल्या व २०१४ च्या नियमावलीनुसार मान्य झालेल्या प्रकल्पांनादेखील होणार आहे.
- पांडुरंग पोळे, कार्यकारी अधिकारी, एसआरए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com