महात्मा गांधी विद्यापीठाशी "एफटीआयआय'चा करार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पुणे - भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि बिहारमधील महात्मा गांधी सेंट्रल युनिर्व्हसिटी यांच्यात शैक्षणिक आणि व्यावसायिक समन्वयासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. याचा लाभ चित्रपट, दूरचित्रवाणी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना होणार आहे. 

या दोन्ही शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक विकासाला अधिकाधिक चालना मिळावी, यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरेल. करार पत्रावर एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कैंथोला आणि बिहारमधील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरविंद अग्रवाल यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत अध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासाठी "आदान- प्रदान' (एक्‍स्चेंज) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 

संशोधन, संकलन, प्रकाशन यासाठी हा करार उपयुक्त ठरणार असून, दोन्ही संस्थांमधील तज्ज्ञांशी परिषद, चर्चासत्र, कार्यशाळा याद्वारे संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी "कार्यानुभव' (इंटर्नशिप) यासारखे उपक्रम करारांतर्गत राबविण्यात येणार आहेत. अभ्यासक्रम ठरविण्यासाठीही याची मदत होईल, अशी माहिती चित्रपट संशोधन अधिकारी डॉ. चंद्रशेखर जोशी यांनी दिली.

Web Title: FTII agreement with Mahatma Gandhi University