‘एफटीआयआय’चा बेपत्ता विद्यार्थी अखेर सापडला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

पुणे - प्राध्यापकाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झालेला राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) एक विद्यार्थी दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळे संस्थेत एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, संबंधित विद्यार्थी उत्तर प्रदेशमधील त्याच्या नातेवाइकाकडे सुखरूप असल्याची माहिती मिळाली. मनोज कुमार (वय ३१, मूळ रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) असे संबंधित विद्यार्थ्याचे नाव आहे. ‘एफटीआयआय’ प्रशासनाने विद्यार्थी बेपत्ता असल्याची तक्रार डेक्कन पोलिस ठाण्यात दिली होती. मनोज कुमार व त्याचा मित्र श्रीनिवास यांनी काही दिवसांपूर्वी कलादिग्दर्शन विभागातील एका प्राध्यापकाशी गैरवर्तन केले होते. त्यावरून दोघांवर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश निघाल्यावर मनोज कुमार बेपत्ता झाला होता, तर श्रीनिवासन त्याच्या गावी गेला होता. मनोज कुमार बेपत्ता झाल्यामुळे ‘एफटीआयआय’ प्रशासनही चिंतेत होते. मात्र कुमार हा उत्तर प्रदेशातील जयसिंगपूर येथे राहणाऱ्या त्याच्या मावशीकडे असल्याची माहिती मिळाली, अशी माहिती डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली.

Web Title: FTII missing students finally found