दीड लाख कोटींचा ‘धूर’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

टोल नाक्यांवर इंधनाचे नुकसान; शिरोडकर यांची माहिती

कात्रज - टोल नाक्‍यावर थांबणाऱ्या वाहनांचे देशात वर्षाला दीड लाख कोटी रुपयांचे इंधन वाया जात आहे, तर टोलपोटी केवळ चौदा हजार कोटी वसूल होत आहेत. हे नुकसान टाळण्यासाठी टोलचा झोल थांबला पाहिजे, असे मत माहिती अधिकारी कार्यकर्ते व टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी व्यक्त केले.  

श्री साई स्नेह सोहळा सामाजिक संस्थेतर्फे आयोजित तपपूर्ती साई उत्सवात शिरोडकर यांना ‘साई स्नेह पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

शिरोडकर म्हणाले, ‘‘टोल नाक्‍यावर वाहने थांबून २०१२ या वर्षात साठ हजार कोटी रुपयांचे इंधन वाया गेले होते. २०१४ या वर्षात सत्याऐंशी हजार कोटींचे नुकसान झाले होते, तर २०१६ या वर्षात एक लाख कोटी पंचेचाळीस हजार रुपयांचे पेट्रोल व डिझेल वाया गेले; परंतु त्या बदल्यात केवळ चौदा हजार कोटी रुपये वसूल झाले. देशाला टोलमुक्त करून आर्थिक नुकसान टाळले पाहिजे. त्याचबरोबर 

टोलमध्ये पारदर्शकता आणली पाहिजे.’’ 
या वेळी महापौर प्रशांत जगताप, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे व अश्विनी कदम, सुभाष जगताप, आबा बागूल, नगरसेवक शिवलाल भोसले, दिनेश धाडवे, अस्मिता शिंदे, मोहिनी देवकर, प्रकाश कदम, नितीन कदम, नीलेश ढमढेरे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी स्वागत केले.

पोस्टमनच्या हस्ते उत्सवाचे उद्‌घाटन
उत्सवाचा प्रारंभ अकरा पोस्टमनच्या हस्ते झाला. या वेळी अनंत झांबरे यांच्या योग प्रशिक्षणाचा लाभ दोनशे साईभक्तांनी घेतला. नृत्य व रांगोळी स्पर्धांचे पारितोषिक वितरण सुजाता केरीकोप्पा व मूर्तिकार सुप्रिया शिंदे यांच्या हस्ते झाले.

Web Title: fuel loss on toll naka