इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

पिंपरी - पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता. ६) चिंचवड स्टेशन ते चिंचवडगावातील चापेकर चौकदरम्यान आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या वेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेता दत्तात्रेय साने, नगरसेविका सुलक्षणा धर, भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर आदी उपस्थित होते. 

या वेळी संजोग वाघेरे म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्षाने मतदारांना खोटी आश्‍वासने देऊन सत्ता काबीज केली. परंतु नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झाले आहे. गॅस सिलिंडरही महाग झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसंदर्भात केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट दाखवीत आहे. राज्य सरकार मात्र काहीच निर्णय घेत नाही.’’

विशाल वाकडकर म्हणाले, ‘‘यूपीए सरकारच्या कालावधीत पेट्रोलचे दर एक रुपयाने वाढला तरी भाजप नेते आंदोलन करीत होते. आता आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊनही सरकार ते वाढवून सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारत आहे.’’

या आंदोलनादरम्यान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चिंचवड स्टेशनपासून चिंचवड गावातील चापेकर चौकापर्यंत मोटार हाताने ढकलत आणली. मोटारीवर २०१४ मध्ये यूपीए सरकार असतानाचा (पेट्रोल ६८ रुपये) आणि सध्याचा (पेट्रोल ८७ रुपये, डिझेल ७५ रुपये) दराचा फलक लावण्यात आला होता. 

या आंदोलनाच्या वेळी चिंचवड स्टेशनकडून चिंचवडगावाकडे येणाऱ्या पुलावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामध्ये एक रुग्णवाहिका अडकली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com