Loksabha 2019 : दिव्यांगाच्या मतदानामुळे कर्तव्यपूर्ती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

पुणे - ‘त्याच्या’ मतदानासाठी स्ट्रेचर बोलावले असते; पण त्याला मतदानापासून नक्की वंचित ठेवले नसते... पहिल्या मतदानानंतर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदच इतका बोलका होता की, त्यातच कर्तव्यपूर्तीचे समाधान वाटले... तो आता पुढील महिनाभर बोटावर लावलेली शाई प्रत्येकाला अभिमानाने दाखवेल.

मार्केट यार्डजवळील संदेशनगर येथील कै. श्रीकांत भगवानराव भडके प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावरील क्षेत्रीय अधिकारी बाळासाहेब गायकवाड बोलतं होते... प्रणव इजंतकर या अर्धांगवायू झाल्याने व्हीलचेअरवर आलेल्या मतदाराला गायकवाड यांनी मतदानासाठी मदत केली. 

प्रणव हा खरंतर अभियांत्रिकीची पदविका मिळालेला विद्यार्थी. तीन वर्षांपूर्वी सिंहगड चढताना डोक्‍यात दगड पडल्याने त्याच्या मेंदूला मार लागला होता. त्यातून त्याला अर्धांगवायू झालेला; पण पहिलेच मतदान करण्याचा त्याचा उत्साह त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता. मतदान केंद्रावर आल्यानंतर  कळले की, त्याचे मतदान केंद्र पहिल्या मजल्यावर आहे. मतदान केंद्रात ना लिफ्ट आहे  ना रॅंम्प. मग जायचे कसे, हा प्रश्‍न त्याच्या वडिलांना पडला.  त्याचे वडील मनोज म्हणाले, ‘‘मतदानाच्या चिठ्ठीवर तळमजला असे लिहिले होते. त्यामुळे त्याला मतदानासाठी आणले.’’

त्यांनी तातडीने क्षेत्रीय अधिकारी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. ते प्रणवजवळ आले. त्या वेळी तो मतदानासाठी उत्सुक असल्याचे दिसले. त्यांनी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रणवला व्हीलचेअरसह उचलून पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रापर्यंत घेऊन गेले. तेथे त्याने मतदान केले आणि तो हसत बाहेर आला. त्याला परत पायऱ्यांवरून खाली आणले. त्या वेळी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हात हातात घेऊन धन्यवाद दिले.

गायकवाड म्हणाले, ‘‘त्यांनी दिव्यांग असल्याची नोंदणी केलेली नव्हती. त्यामुळे त्यांना तळमजल्यावरील मतदान करता येत नव्हते. या मतदान केंद्रावरील पाच जणांनी दिव्यांग असल्याची नोंदणी केली होती; पण त्यात प्रणवचे नाव नव्हते. तो ज्या उत्साहाने मतदानासाठी आला होता तो सर्वांत महत्त्वाचा होता. त्याला मतदान न करता परत पाठवणे अयोग्य वाटले. त्यामुळे प्रणवला व्हीलचेअर उचलून घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा मतदानाचा उत्साह इतका दांडगा होता की, वेळप्रसंगी स्ट्रेचर मागवले असते.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fulfillment due to Divyang voting