#full2smart विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाकडे लक्ष देण्याची गरज - पोलिस निरिक्षक पाटील

जनार्दन दांडगे
गुरुवार, 28 जून 2018

स्पर्धा परीक्षांचे मागील काही वर्षातील निकाल पाहिले असता ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. स्पर्धा परीक्षा देवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालेय वयापासून शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर अवांतर वाचनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे व्यक्त केले.
 

उरुळी कांचन - स्पर्धा परीक्षांचे मागील काही वर्षातील निकाल पाहिले असता ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. स्पर्धा परीक्षा देवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालेय वयापासून शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर अवांतर वाचनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे व्यक्त केले.

सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या 'फुल टू स्मार्ट' स्पर्धेच्या निमित्ताने उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात गुरुवारी (ता. २८) आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्पर्धापरीक्षा व ग्रामीण भागातील विद्यार्थी या विषयावर बोलताना पाटील यांनी वरील मत मांडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे खजिनदार राजाराम कांचन होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अशोक काकडे, पर्यवेक्षक बबन दिवेकर, देविदास टिळेकर, पर्यवेक्षिका लता चव्हाण, सकाळ माध्यम समूहाचे जिल्हा वितरण व्यवस्थापक योगेश निगडे, शशिकांत जगताप, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

क्रांतीकुमार पाटील यावेळी म्हणाले,"स्पर्धा परीक्षांचा निकाल पाहता शहरी विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता असल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर इतिहास, भूगोल सामान्य ज्ञान अशा सर्व प्रकारच्या अवांतर वाचनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षा फार कठीण असतात हा गैरसमज विद्यार्थ्यांनी काढून टाकावा केवळ अवांतर वाचन व अभ्यासाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळवता येते असा आपला अनुभव आहे."

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राजाराम कांचन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर योगेश निगडे यांनी विद्यार्थ्यांना 'फुल टू स्मार्ट' स्पर्धेचे महत्व, नियम, अटी व बक्षिसांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. जी. जाधव यांनी केले. 

'फुल टू स्मार्ट' स्पर्धा ही केवळ बक्षीस देण्यासाठी न ठेवता विद्यार्थ्यांमधील वाचनाची आवड वाढावी याकडे लक्ष दिल्याबद्दल सकाळ माध्यम समूहाचे मन:पूर्वक आभार. यापूर्वीच्या काळात सकाळ वृत्तपत्राने विद्यार्थ्यांसाठी ज्युनिअर लिडर व इतर अनेक स्पर्धा यशस्वीरित्या राबविल्या आहेत, आगामी काळात देखिल विविध स्पर्धांतून त्यांचा हा प्रयत्न सुरु राहील अशी अपेक्षा आहे, असे मत महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य अशोक काकडे यांनी व्यक्त केले.

Web Title: #full2smart Need to concentrate on reading says Police Inspector Patil