बारामती - 50 अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी 48 लाख 93 हजार रुपयांचा निधी

बारामती - 50 अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी 48 लाख 93 हजार रुपयांचा निधी

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासुन दुरावस्था झालेल्या अंगणवाड्यांच्या दुरुस्तींची कामे आता मार्गी लागणार आहेत. यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास योजनेंर्तगत तालुक्यातील 50 अंगणवाडीच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी 48 लाख 93 हजार लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. अशी माहिती बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले व गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील अनेक ठिकाणच्या अंगणवाडीतील मुलांना गेल्या काही वर्षापासुन जिर्ण झालेल्या, दुरावस्था झालेल्या इमारतीमध्ये शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवावे लागत होते. या पार्श्वभूमिवर पुणे जिल्हा परिषेदच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातुन एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंर्तगत बारामती तालुक्यातील 50 अंगणवाड्याच्या इमारत दुरुस्तीसाठी 48 लाख 93 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहेत. यामुळे याभागातील अंगणवाड्यांच्या इमारतींचा दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

यानुरुप बारामती एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाच्या विस्तार अधिकारी पुनम मराठे यांनी दिलेल्या माहिती नुसार इमारत दुरुस्ती मंजुर झालेल्या अंगणवाडीचे नाव व गावची नावे खालील प्रमाणे - नाळेवस्ती, येळेवस्ती, साठेनगर, रमामातानगर (माळेगाव बु.), पवार वस्ती, ढेलेवस्ती, मोतीबाग, ( गुणवडी), पाचभाई वस्ती, तावरे पाटील वस्ती (सांगवी), कोकणेवस्ती ( झारगडवाडी), इरिगेशन बंगला, बौध्द वस्ती, माळीवस्ती, वडगाव पांढरी ( वडगाव निंबाळकर), मतेवाडी ( सोनवडी सुपे), रसाळपाटील वस्ती( देऊळगाव रसाळ), सायंबाची वाडी( लोणीभापकर), जगताप वस्ती, हनुमानवाडी( पणदरे), माळवाडी (आंबी बु.), सचिननगर (पणदरे), घोडकेवस्ती, अंबिकानगर (मान्नाप्पावस्ती), आबाजीनगर, भिकोबानगर,  ( धुमाळवाडी),  कन्हेरवाडी (खंडोबाचीवाडी), मासाळवाडी, दिपनगर( काटेवाडी), गावठाण (शिरवली), गावठाण (कांबळेश्वर), खांडज (खांडज), कुरणेवस्ती( निरावागज), मळद, दातेवस्ती (मळद), शिरसाईवस्ती, काकडे काॅलनी ( निंबुत), वाणेवाडी 1 व 2 (वाणेवाडी), पेशवेवस्ती, मातंगवस्ती ( कोऱ्हाळे बु.), शिंदे गोफणेवस्ती ( मुर्टी), जोगवडी ( जोगवडी), वाकी (वाकी), रासकरमळा (ढाकाळे), गावठाण, कर्चेवाडी (सोरटेवाडी), म्हेत्रेवस्ती (शिर्सुफळ), साळुंखेवस्ती (जराडवाडी).

जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन अंगणवाड्यांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार अजित पवार यांच्या सुचनेप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्यासह तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रयत्नातुन निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे अंगणवाडीमध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा  देण्यास मदत होणार आहे, असे बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com