इंदापूर तालुक्यात नागरी सुविधांसाठी २५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dattatray bharane

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १५ कोटी ५० लाख तर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागमाध्यमातून १० कोटी असे एकूण २५ कोटी ५० लाखरुपये मंजूर केले आहेत.

इंदापूर तालुक्यात नागरी सुविधांसाठी २५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर

इंदापूर- पुणे जिल्हा परिषद दलित वस्ती (Dalit Area) सुधारणा योजना तसेच महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील (Indapur Tahsil) दलित वस्ती नागरी सुविंधासाठी (Amenities) २५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी (Fund) मंजूर (Sanction) करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी दिली.

श्री. भरणे पुढे म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १५ कोटी ५० लाख तर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागमाध्यमातून १० कोटी असे एकूण २५ कोटी ५० लाखरुपये मंजूर केले आहेत. निधीतून होणाऱ्या कामामुळे दलित बांधवांना चांगल्या प्रतीच्या सुविधा उपलब्ध होवून तालुक्याच्या वैभवात भर पडेल.

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गावनिहाय मंजूर निधी रुपयात पुढील प्रमाणे - अजोती नवीन बौध्दविहार इमारत, समाज मंदिर संरक्षक भिंत, बैठक कट्टा बांधकाम -१५ लाख, चांडगांव बौध्द समाज मंदिर, मातंग समाज मंदिर सुशोभीकरण काम - १० लाख, वालचंदनगर १४३ चाळ बंदिस्त गटार काम - १० लाख, रस्ता कॉंक्रिटी करण - २५ लाख, सौर प्रकाश व्यवस्था - ५ लाख, १४४ चाळ बंदिस्त गटार काम - १० लाख, रस्ता कॉंक्रिटीकरण - २५ लाख, सौर प्रकाश व्यवस्था - ५ लाख, आंबेडकर नगर येथील रस्ता कॉंक्रिटीकरण काम - २५ लाख, बंदिस्त गटार काम - १० लाख, सौर प्रकाश व्यवस्था - ५ लाख, मानेवस्ती रस्ता कॉंक्रिटी करण - २५ लाख, बंदिस्त गटार काम - १० लाख, सौर प्रकाश व्यवस्था - ५ लाख, लोहार वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण - २५ लाख, बंदिस्त गटार काम - १० लाख, सौर प्रकाश व्यवस्था - ५ लाख, वालचंदनगर गायकवाड वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण - २५ लाख, बंदिस्त गटार काम - १० लाख, सौर प्रकाश व्यवस्था - ५ लाख, तीन चाळ येथे रस्ता कॉंक्रिटीकरण - २५ लाख, बंदिस्त गटार काम - १० लाख, सौर प्रकाश व्यवस्था - ५ लाख, धवलपुरी रस्ताकॉंक्रिटीकरण २५ लाख, बंदिस्त गटार काम - १० लाख, सौर प्रकाश व्यवस्था - ५ लाख, सेवा कॉलनी रस्ता कॉंक्रिटीकरण - २५ लाख, बंदिस्त गटार काम - १० लाख,सौर प्रकाश व्यवस्था - ५ लाख, अंथुर्णे येथील अ. जा. वस्ती रस्ता काँक्रेटी करण २० लाख, साबळे वस्ती ९, २, आणि ४ येथे रस्ता काँक्रेटीकरण - प्रत्येकी २० लाख, भरणेवाडी खरात वस्ती रस्ता काँक्रेटीकरण - २० लाख, वडापूरी अण्णाभाऊ साठे नगर सांस्कृतिक भवन बांधकाम - २० लाख, लासुर्णे अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सभागृह व अभ्यासिका बांधकाम - २० लाख, नवदारे बुध्दविहार परिसर सुशोभीकरण - २० लाख, शेटफळगढे बौध्द विहार परिसर स्वागत कमान - १० लाख, भवानीनगर डॉ बाबासाहेब आंबेडकरसामाजिक भवन बांधकाम ५५ लाख, गिरवी समाज मंदिर बांधकाम - २० लाख, कळाशी बौध्द विहार परिसर पेव्हिंग ब्लॉक बसवणे - १० लाख, कडबनवाडी जाधव वस्ती समाज मंदिर बांधकाम १० लाख, सणसर अशोकनगर, खवळेवस्ती, सोनवणे आवळे वस्ती समाजमंदिर परिसरसुशोभी करण - प्रत्येकी १० लाख, निमसाखर पिरवस्ती, मातंग वस्ती समाजमंदिर परिसर सुशोभीकरण - १० लाख, गावठाण समाजमंदिर परिसर सुशोभीकरण - १० लाख, निरगुडे सोनवणेवस्ती सामाजिक सभागृह बांधकाम - १० लाख, गावठाण सामाजिक सभागृह बांधकाम - २० लाख, लुमेवाडी निंबोडी येथे अण्णाभाऊ साठे नगर येथे सामाजिक सभागृह बांधकाम - १५ लाख, तक्रारवाडी अण्णाभाऊ साठे सभागृह - १५ लाख, डाळज नं. १ अंबिकानगर भोसलेवस्ती सामाजिक सभागृह व अण्णाभाऊ साठे मंदिर सुशोभीकरण - प्रत्येकी १० लाख, गोतोंडी मोरे वस्ती नं. २ सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, गिरवी समाजमंदिर २० लाख, अकोले बौध्द विहार समाज मंदिर सभागृह - १० लाख, पोंधवडी अण्णाभाऊ साठेनगर मातंग समाज मंदिर - १० लाख, अण्णाभाऊ साठे परिसर सुशोभीकरण - १० लाख, नरसिंहपूर समाज मंदिर - २० लाख, काझड मोरवाडा समाज मंदिर सुशोभीकरण व पेव्हींग ब्लॉक बसवणे - १० लाख, डाळज नं. ३ देवकुळे भोसले वस्ती समाज मंदिर बांधणे १० लाख, हगारेवाडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ते ग्रा. पं. कार्यालय रस्ता काँक्रेट करणे - १० लाख, जाचकवस्ती समाज मंदिर बांधणे - १५ लाख, लक्ष्मीमाता मंदिर सामाजिक सभागृह बांधणे - १० लाख, उध्दट मातंग समाज मंदिर बांधणे व सुशोभी करण - १० लाख, सपकळवाडी मागासवर्गीय वस्ती व्यायामशाळा बांधकाम - १० लाख, वाचनालय तसेच अभ्यासिका बांधकाम - १० लाख, बेलवाडी झोपडपट्टी रस्ता व मातंग वस्ती येथे रस्ता करणे यासाठी प्रत्येकी १० लाख, कळंब मागासवर्गीय वस्ती वाचनालय, अभ्यासिका बांधकाम - २५ लाख.

पुणे जिल्हा परिषद दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत गावनिहाय मंजूर निधी रुपयात पुढील प्रमाणे - अंथुर्णे ६३ लाख, काझड ६ लाख, गलांडवाडी नंबर २ - १५ लाख, गोतंडी ते गावठाण रस्ता कॉंक्रिटीकरण ५ लाख, चिखली २१ लाख, जाचक वस्ती ३० लाख, निंबोडी २३ लाख, निमसाखर ७० लाख, निरगुडे ६ लाख, पिटकेश्वर २० लाख, पोंधवडी ४० लाख, बाभुळगाव ३० लाख, बिजवडी ७६ लाख, बेलवाडी ४० लाख, बोरी १४२ लाख, म्हसोबाची वाडी १२ लाख, रणगाव ८० लाख, रुई ४७ लाख, लासुर्णे १२० लाख, वरकुटे खुर्द ४० लाख, वालचंदनगर लोहार वस्ती, गायकवाड वस्ती, ३ चाळ आंबेडकर नगर १४३ आणि १४४ चाळ ७० लाख, व्याहळी २५ लाख, शहा ४२ लाख, शिंदेवाडी ६ लाख, शेटफळ हवेली २० लाख, सणसर १०८ लाख, सपकळवाडी ४९ लाख, सरडेवाडी ६ लाख रुपये.

Web Title: Fund Of Rupees 25 Crore 50 Lakhs Sanctioned For Civic Amenities In Dalit Area In Indapur Taluka Dattatray Bharane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top