भुयारी मार्गासाठी निधी मंजूर

भुयारी मार्गासाठी निधी मंजूर

पुणे - हडपसर भागातील रामटेकडी आणि काळेपडळ येथे रेल्वे फाटकाजवळ हलक्‍या वाहनांसाठी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेला सुमारे ६ कोटी ९८ लाख रुपये देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे.

या भागातून जाणाऱ्या मार्गावर रेल्वे आल्यानंतर येथे असलेले फाटक दिवसातून अनेकवेळा बंद करावे लागते. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांकडून केली जात होती. पुणे-मिरज मार्गावर असलेल्या रामटेकडी व काळेपडळ येथील रेल्वे फाटकाची रुंदी सहा मीटरहून नऊ मीटर वाढविण्यासाठी यापूर्वी रेल्वे प्रशासनाला एक कोटी ११ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याची सूचना केली होती. त्यानुसार हा निधी दिला जाणार आहे, असे समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

बालवाडी शिक्षिकांना वेतनवाढ 
पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडील बालवाडी शिक्षिका व सेविका यांना सरसकट वेतनवाढ न देता त्यांचा सेवा कालावधी विचारात घेऊन मानधन दिले जाणार आहे. पंधरा वर्षांहून कमी सेवा झालेल्या बालवाडी शिक्षिकांना दहा हजार रुपये व सेविकांना साडेसात हजार रुपये मानधन दिले जाईल. त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या शिक्षिकांना अकरा हजार पाचशे रुपये व सेविकांना साडेआठ हजार मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कलादालनाच्या निविदेस मंजुरी
बालेवाडी येथे व्यंग्यचित्रकार आर. के. लक्ष्मण कलादालन उभारण्यासाठी एक कोटी बावीस लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली. या कलादालनामुळे शहरातील कलाकारांना आपल्या कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. आर. के. लक्ष्मण यांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे कलादालन निर्माण केले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com