विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दक्षता घ्या - पवार
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दक्षता घ्या. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी सर्वांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे गरजेचे आहे, शक्‍यतो गर्दीत जाणे टाळा, हस्तांदोलन करू नका. खोकताना व शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरा, असे आवाहन त्यांनी केले.

पुणे/घोरपडी - ‘‘नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा, अखंडित वीज, रिंगरोड आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासह विविध विकासकामांसाठी निधी देण्यात येत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही,’’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोंढवा खुर्द येथे (प्रभाग क्र.२६) साडेचार किलोमीटर जलवाहिनी आणि श्री गुरुनानक देवजी उद्यानाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, नगरसेविका नंदा लोणकर आदी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘उद्याने ही शहरांची फुफ्फुसे आहेत. प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनावर भर द्यायला हवा. त्याचबरोबर घनकचरा वर्गीकरण आणि विघटन करणे आवश्‍यक आहे. जागतिक दर्जाचा चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासाठी सहकार्य करण्यात येत आहे.’’ महापौर मोहोळ, नगरसेविका लोणकर यांनी मनोगत व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funds for development will not fall short ajit pawar