इंदापूर तालुक्याला व्यायमशाळेसाठी निधी

राजकुमार थोरात
शनिवार, 12 मे 2018

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जास्तीजास्त विकास निधी आणण्याचे काम सुरु आहे. तालुक्यातील १८ गावामध्ये २१ मागासवर्गीय वस्तीमध्ये व्यायामशाळेसाठी ३७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

वालचंदनगर पुणे - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यातील १८ गावामध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये व्यायामशाळेच्या साहित्यासाठी ३७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जास्तीजास्त विकास निधी आणण्याचे काम सुरु आहे. तालुक्यातील १८ गावामध्ये २१ मागासवर्गीय वस्तीमध्ये व्यायामशाळेसाठी ३७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

एका व्यायमशाळेच्या संचाची किंमत १ लाख ७८ हजार रुपये असून यामध्ये सहा प्रकारचे व्यायामाचे साहित्य आहेत. यामध्ये पुढील गावांचा व वस्त्यांचा समावेश आहे. लासुर्णे (लक्ष्मीनगर गावठाण), तरंगवाडी (लोंढेवस्ती, जाधवस्ती), चांडगाव, मदनवाडी (विरवाडी नंबर-२), शिंदेवाडी,लाकडी, काझड, रुई (कांबळेवस्ती, भगतवस्ती), अगोती नंबर - २, बावडा, माळवाडी नंबर-२, खोरोची (भोसलेवस्ती), वडापुरी (पाजगेवस्ती), शेळगाव (मातंवस्ती), कौठळी (खामगळवाडी), निमगाव केतकी, कळस (ओगलेवस्ती व गावठाण) व तावशी या गावांचा समावेश आहे.

Web Title: Funds for gym in Indapur taluka