esakal | रूढी परंपरेला फाटा देत मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा आणि अग्नी
sakal

बोलून बातमी शोधा

रूढी परंपरेला फाटा देत मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा आणि अग्नी

रूढी परंपरेला फाटा देत मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा आणि अग्नी

sakal_logo
By
कृष्णकांत कोबल

हडपसर : क्षमता असूनही भेदाभेदाच्या अनेक अमंगल सामाजिक रूढी परंपरांनी महिलांना विविध बंधनात अडकवून ठेवले आहे. कायदा आणि सामाजिक जागृतीमुळे त्यामध्ये हळूहळू बदल होताना दिसत असला तरी आजूनही काही गोष्टी त्याला अपवाद ठरत आहेत. आई वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा नसेल तर रूढी परंपरेने मुलींना तो अधिकार दिलेला नाही. मात्र, हिंमतीने रूढींचे जू दूर करीत तो अधिकार मिळवता येत असल्याचे आणखी एक उदाहरण उंड्री येथील भगिनींनी आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा व अग्नी देऊन दाखवून दिले आहे.

उंड्री गावच्या माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी उपसभापती शारदा होले यांचे नुकतेच अकाली निधन झाले. मुलगा नसल्याने मृत्यूनंतर आपल्या मुलींनी आपल्यावर अखेरचे संस्कार करावेत, अशी इच्छा शारदा व मोहन होले यांनी वेळोवेळी आपल्या मुलींकडे केली होती. त्यानुसार याबाबतची सर्व सामाजिक बंधने व रुढी परंपरा झुगारत त्यांच्या निकिता शेवते व प्राजक्ता वाकचौरे या मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा व अग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांकडून कौतुक होत असतानाच अकाली गेलेल्या आईच्या सेवेतील मुलींना बघून हळहळही व्यक्त केली जात होती.

हेही वाचा: IND vs ENG: शेवटची कसोटी रद्द झाल्यावर BCCI ची ECB ला नवी ऑफर

शारदा व त्यांचे पती मोहन होले हे दोघेही सामाजिक जाणीवेने प्रेरित आहेत. सामाजिक कामाच्या आवडीमुळे शारदा होले यांनी महिलांसाठी पतसंस्था सुरू करून त्यांना बचतीची व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. उंड्री व परिसरातील विकासात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी मुलींवर केलेले संस्कार इतरांना दिशा देणारे आहेत, अशा भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केल्या.

"आम्ही दोघीही मुली असलो तरी आईवडिलांनी आम्हाला काहिही कमी पडू दिले नाही. आमच्यावर समानतेचे संस्कार त्यांनीच केले आहेत. आम्हीही त्यांना मुलगा नसल्याची उणीव जाणवू दिली नाही. मृत्यूनंतर होणारे सर्व संस्कार आपल्या मुलींनीच करावेत, अशी पहिल्यापासून आईवडिलांची इच्छा आहे. या इच्छेनुसार आम्ही बहिणींनीही तसा निर्णय घेतला. कदाचित समाजाकडून या कृतीला विरोध झालाही असता. मात्र, वडीलांनी पुढाकार घेऊन मुलीच अंत्यसंस्कार करतील, असा अग्रह धरल्याने आम्हाला मोठा आधार मिळाला व आईच्या पार्थिवावर आम्ही अंत्यसंस्कार करू शकलो. काही चांगल्या परंपरा जपल्याच पाहिजेत. मात्र, भेदाची दरीही मिटवली पाहिजे. ही दरी मिटल्याने मुलगाच हवा, हा अट्टाहास राहणार नाही. त्यामुळे आम्ही आईच्या अंत्यसंस्काराचा घेतलेला निर्णय सामाजिक बदलास निश्चितपणे चालणा देईल असे वाटते," अशी भावना निकिता शेवते व प्राजक्ता वाकचौरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: Ganesha Chaturthi 2021 : मानाच्या 5 गणपतींची विधीवत प्राणप्रतिष्ठापना

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा नियोजन समिती सदस्य निवृत्ती बांदल, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे तसेच, बाळासाहेब टकले, संदीप बांदल, मछिंद्र दगडे, यांनी श्रद्धांजली वाहून मुलींच्या काळाशी सुसंगत विचारांचे कौतुक करीत श्रीमती होले यांना श्रध्दांजली वाहिली.

loading image
go to top