सांडपाणी वाहिनी फुटल्याने शिर्सुफळला दुर्गंधी

संतोष आटोळे
रविवार, 1 एप्रिल 2018

गावातील सांडपाणी गावाबाहेर काढण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत अंर्तगत सांडपाणी वाहिनीचे काम करण्यात आले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सदर लाईन ही दुध संकलन केंद्रापासून काही अंतरावर फुटली आहे. यामुळे यामधून वाहणारे सांडपाणी बाहेर येऊन तेथे तसेच शेजारील ओढ्याच्या पात्रामध्ये साठत आहे.

शिर्सुफळ (ता. बारामती) - येथील सांडपाणी वाहुन नेणारी लाईन फुटल्याने गाव परिसरातील दुध संकलन केंद्राजवळ आटोळे वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड घाण पाणी साठले आहे. यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच सदर दुषित पाणी ओढ्याच्या पात्रात साठत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने तात्काळ कार्यवाही न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा बारामती तालुका दुध संघाचे संचालक व शिर्सुफळ ग्रामपंचायत सदस्य अॅड. नितीन आटोळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गावातील सांडपाणी गावाबाहेर काढण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत अंर्तगत सांडपाणी वाहिनीचे काम करण्यात आले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सदर लाईन ही दुध संकलन केंद्रापासून काही अंतरावर फुटली आहे. यामुळे यामधून वाहणारे सांडपाणी बाहेर येऊन तेथे तसेच शेजारील ओढ्याच्या पात्रामध्ये साठत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. त्यातील सांडपाणी पाणी वाहून शेजारील ओढ्याच्या पात्रात मिसळत आहे. तसेच जवळच गावठाण स्मशानभूमी आहे. याच परिसरातून आटोळेवस्तीकडे जाणार मार्ग आहे. परिणामी स्मशानभूमीकडे तसेच या मार्गावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. 

'गेल्या सात आठ महिन्यांपासून ग्रामपंचायतील कळवुन ही तसेच याबाबत सदस्यांच्या मासिक बैठकीमध्ये ठराव घेवुनही कार्यवाही होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच सदर ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले कामाला प्राधान्य देण्याचे सोडून दुसरी चुकीची कामे केली जात आहेत. तसेच कामांबाबत सदस्यांनाही माहिती दिली जात नाही. याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात येणार आहे.' असे शिर्सुफळचे ग्रामपंचायत सदस्य अॅड. नितीन आटोळे यांनी सांगितले. तर शिर्सुफळचे सरपंच अतुल हिवरकर म्हणाले, 'येथील सांडपाणी वाहिनी फुटल्याने ग्रामस्थांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने सांडपाणी वाहिनी दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात येणार आहे. तसेच गावामध्ये सुरु असलेली सर्व विकासकामे ही नियमानुरुप चालु आहेत.' 

Web Title: funk spread in shirsufal because of Sewage water