
Pune News : फुरसुंगी,उरुळी देवाची नगरपरिषदे बाबत संमिश्र वातावरण
फुरसुंगी : महापालिकेतून वगळून नवीन नगरपरिषदेचा शाशकीय आदेश प्राप्त झाल्याने फुरसुंगी आणि उरुळी देवाची मधील काही नागरिकांनी आनंद साजरा केला तर काहींनी बोलण्याचे टाळले. त्यामुळे या निर्णयाला नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया असल्याचे जाणवत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन नगरपरिषदेची घोषणा तीन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती.मात्र याबाबतचा शाशकीय आदेश न मिळाल्याने येथील नागरिक चिंतेत होते.आता सरकारी आदेश मिळाल्याने काही नागरिकांकडून आनंद तर काहींकडून नाराजी व्यक्त होत आहे.
धनंजय कामठे( फुरसुंगी ग्रामस्थ): शाशकीय आदेशाचे आम्ही स्वागत करत आहोत.महापालिकेच्या जाचक करामधून आमची सुटका झाली आहे.येणाऱ्या पुढील काळात आमच्या गावातीलच लोक कारभार हाताळणार असल्याने आम्हाला गावाचा खऱ्या अर्थाने विकास करता येईल.
तात्यासाहेब भाडळे( उरुळी देवाची ग्रामस्थ): नवीन नगरपरिषदेचे स्वागत करत आहोत.मिळकत कर कमी होऊन ग्रामस्तानची आर्थिक घडी सुरळीत होण्यास मदत होनार आहे.नागरिकांना सर्व सुविधा मिळतील यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
संतोष हरपळे( फुरसुंगी ग्रामस्थ): गावाचा विकास जलद गतीने होण्यास मदत होईल.सोयी सुविधांसाठी आंदोलनं करण्याची वेळ येणार नाही.शाशकीय आदेशाचे स्वागत करत आहोत.नागरिकांना तक्रार करण्याची वेळ येऊ नये याची काळजी घेणार आहोत.
महेंद्र सरोदे( स्थानिक ग्रामस्थ फुरसुंगी): पाच वर्षांच्या वनवासानंतर नगरपरिषद आल्याने आता गावाच्या हाती कारभार आल्याने सुधारणा होतील.कर ही कमी होईल आणि सुविधाही मिळतील याचा आनंद आहे.
दिनकर हरपळे( फुरसुंगी ग्रामस्थ): हा घाईघाईने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही.जो विकास महापालिकेकडून होणार आहे तो नागरपरिषेकडून होणार नाही.आम्हाला महापालिकाच हवी आहे त्यामुळे या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत.