फुरसुंगी गंगानगर परिसरात गाड्यांच्या काचा फोडून दहशत

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 3 जुलै 2018

मांजरी : परिसरात दबदबा निर्माण करण्यासाठी फुरसुंगी गंगानगर परिसरातील एका टोळक्याने हातात कोयते, लोखंडी रॉड घेऊन रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या चारचाकी व दुचाकी गाड्याच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या टोळक्याने एका नागरिकाला कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने त्याच्या खिशातील दीड हजार रुपयेही लाटले. या घटनेत सहा चारचाकी व तीन दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. याबाबत हडपसर पोलिसांनी दहा आरोपींना अटक करून त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

अमोल सूर्यवंशी (वय 22 रा.गंगानगर, फुरसुंगी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ओंकार गवळी, रोहित सोनकांबळे, तुषार भापकर, तन्मय बेडगे, संग्राम नाईक, गुल्या चिंचणे, शोएब शेख, मयूर ढोबळे, आकाश मोहन, दत्ता शिंदे या दहा संशयितांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. 

सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पाच दुचाकीवरून ट्रिपल सीट बसून हातात लोखंडे रॉड व कोयते घेऊन मोठ मोठ्याने ओरडत काही तरुण दहशत माजवत आले. त्यांनी रस्त्याच्या कडेला उभे असताना अमोल सूर्यवंशी यांना कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्या खिशातून दीड हजार रुपये काढून घेतले व त्यांच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. पुढे हे टोळके गंगानगर परिसरातील रस्त्याच्या कडेच्या दोन दुचाक्या व दोन चार चाकी वाहनांच्या काचा फोडीत निघून गेले. पुढे जावून त्यांनी गोंधळेनगर येथील डांगमाळीच्या घरासमोरील दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. 

या घटनेची माहिती समजताच हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे व विश्वजित खुळे यांनी दहशत माजवून धूम ठोकलेल्या संशयितांचा शोध घेतला. याप्रकरणी पोलिसांनी पंधरा आरोपींवर दरोडा व दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दहा जणांना अटक केली आहे. फरार पाच आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे करीत आहेत.

Web Title: fursunig area some youth break Four wheeler glasses