भविष्य ई-वाहनांचेच! खरेदीत होणार वाढ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

दिड वर्षांपूर्वी मी ई-बाईक घेतली होती. इंजिनिअरिंग करत असल्याने दररोज पेट्रोलचा खर्च परवडणारा नवता. त्यामुळे ई-बाईक घेतले. त्यासाठी आरटीओशी संबंधित कोणत्याही कागदपत्राची गरज नसल्याने ती खरेदी करताना खर्चही वाचला, असे ई-बाईक वापरणारा ओमकार खलिफे सांगतो. ‘भविष्यात रस्त्यावर ई वाहनेच असतील’, असा विश्‍वासही तो व्यक्त करतो. त्याच्यासह अनेकांना वाटणाऱ्या या विश्‍वासाला मान्यताप्राप्त संस्थानी आपल्या अहवालातून पुष्टी दिली आहे.

पुणे - दिड वर्षांपूर्वी मी ई-बाईक घेतली होती. इंजिनिअरिंग करत असल्याने दररोज पेट्रोलचा खर्च परवडणारा नवता. त्यामुळे ई-बाईक घेतले. त्यासाठी आरटीओशी संबंधित कोणत्याही कागदपत्राची गरज नसल्याने ती खरेदी करताना खर्चही वाचला, असे ई-बाईक वापरणारा ओमकार खलिफे सांगतो. ‘भविष्यात रस्त्यावर ई वाहनेच असतील’, असा विश्‍वासही तो व्यक्त करतो. त्याच्यासह अनेकांना वाटणाऱ्या या विश्‍वासाला मान्यताप्राप्त संस्थानी आपल्या अहवालातून पुष्टी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रदूषण कमी करण्यासाठी वाहन उद्योगांनी इलेक्‍ट्रॉनिक वाहनांच्या निर्मीतीकडे आधिकाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्या अनुषंगाने २०१९-२० या कालावधीमध्ये ई-वाहनांच्या खरेदीत २० टक्‍क्‍यांनी वाढ नोंदवली गेली आहे. ‘सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्‍चरिंग ऑफ ईलेक्‍ट्रीक व्हेईकल’च्या (एसएमईवी) वार्षिक अहवालातून ही बाब समोर आली आहे. परंतु देशातील ई-वाहनांच्या तुलनेत ही वाढ कमीच आहे. ई-वाहनाच्या खरेदीबाबत नागरिकांचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी ‘ऊर्जा आणि संसाधन संस्थे’च्या (टेरी) वतीने नुकतेच सर्वेक्षण केले गेले. यासाठी ई-वाहन वापरकर्ते व न वापरणाऱ्यांचे मत घेण्यात आले. नागरिकांमध्ये अद्याप अशा वाहनांसंबंधीची पूर्ण माहिती, किंमत, देखभाल अशा वेगवेगळ्या गोष्टींबाबत शंका आहेत, असे सर्वेक्षणात दिसून आले.

ई-वाहन खरेदी समोरील अडचणी 

  • पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत ई वाहनांची खरेदी किंमत जास्त आहे, असे वाटते.
  • वाहन पुन्हा विकायचे ठरल्यास किमतीसंदर्भात संभ्रम. 
  • दूरवरच्या प्रवासासाठी जागोजागी चार्जींगची व्यवस्था नाही. 
  • वाहनात वापरण्यात येणाऱ्या बॅटरी बदलण्याचा खर्च जास्त. 
  • अशा वाहनांची देखभाल सुविधांचा अभाव आणि खर्च जास्त.

ई-वाहनांच्या खरेदीबाबत नागरिकांचे मत टक्केवारीत 

  • खरेदीचा विचार करतोय
  • नक्कीच खरेदी करणार
  • खरेदी करणार नाही 
  • खरेदी करण्याबाबत शंका आहे

ई-वाहनांच्या खरेदेत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र अद्याप याबाबत जागरूकता नाही. ई-वाहन आणि मायलेजचा प्रश्‍न अनेकांना पडतो. ई-वाहनांच्या मायलेजवरही काम केल्यास नक्कीच नागरिकांचा प्रतिसाद वाढेल. 
- पंकज कुलकर्णी, संस्थापक, विहान ईलेक्‍ट्रीक व्हेईकल कंपनी 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Future evehicle purchases will increase