अकरावीचे प्रवेश पूर्णत: ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

पुणे  ‘‘एकापेक्षा अधिक महाविद्यालये आणि प्रवेशासाठी चढाओढ होते, भ्रष्टाचार चालतो, अशा सर्व शहरांमध्ये अकरावीचे प्रवेश पूर्णत: ऑनलाइन केले जाणार आहेत. शिक्षणात सरस्वतीवर लक्ष्मीला मात करू देणार नाही, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.   

पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाषाण शाळांबाबत ते म्हणाले, ‘‘शिक्षण हक्क कायद्यानुसार पाषाणशाळा सुरू ठेवता येणार नाहीत; मात्र त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. त्यांना वाहतुकीच्या साधनांचा पर्याय देऊन अन्य शाळेत समाविष्ट करण्यात येईल.’’ 

पुणे  ‘‘एकापेक्षा अधिक महाविद्यालये आणि प्रवेशासाठी चढाओढ होते, भ्रष्टाचार चालतो, अशा सर्व शहरांमध्ये अकरावीचे प्रवेश पूर्णत: ऑनलाइन केले जाणार आहेत. शिक्षणात सरस्वतीवर लक्ष्मीला मात करू देणार नाही, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.   

पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाषाण शाळांबाबत ते म्हणाले, ‘‘शिक्षण हक्क कायद्यानुसार पाषाणशाळा सुरू ठेवता येणार नाहीत; मात्र त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. त्यांना वाहतुकीच्या साधनांचा पर्याय देऊन अन्य शाळेत समाविष्ट करण्यात येईल.’’ 

...तर गैर काय?
शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी समाजातून पैसे जमा करण्यास सांगितले जात असल्याबद्दल टीका होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर तावडे म्हणाले, ‘‘खरे शिक्षक हे समाजाच्या आर्थिक सहभागातून शाळा उभ्या करतात; परंतु असा निधी उभा करण्याबाबत होणाऱ्या कुरबुरी या नेतेगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या आहेत. विद्यार्थी घडविणारे शिक्षक मात्र अशा तक्रारी करत नाहीत. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच शाळा चांगल्या करण्यासाठी लोकसहभाग मिळवत असतील, तर त्यात गैर काही नाही.’’

सेल्फी काढाच
मुलांची सेल्फी काढण्याचा उपक्रम हा केवळ शाळाबाह्य मुलांसाठीच आहे. तो सर्व मुलांसाठी नाही; परंतु काही शिक्षक आणि पत्रकारांनीदेखील शासन निर्णय वाचला नसल्याने त्यावर टीका झाली. स्थलांतरित विद्यार्थी शाळेत टिकवून राहावेत, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, म्हणून हा उपक्रम आहे, असे सांगत सेल्फी काढण्याचा निर्णय कायम असल्याचे विनोद तावडे यांनी नमूद केले.

म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद (विद्या  प्राधिकरण) आणि पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ (बालभारती) या आस्थापना केवळ एकत्र करणार आहोत. बालभारतीचे अस्तित्व संपुष्टात येणार या टीकेमध्ये तथ्य नाही. ‘यशदा’पेक्षा या प्रबोधिनीचा खर्च स्वस्त असल्याने तेथे प्रशिक्षण घेण्यात काहीच गैर नसल्याचे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

बोगस प्रवेश रोखण्यासाठी एकसंध संगणक प्रणाली
व  रिष्ठ महाविद्यालयांमध्ये होणारे विद्यार्थ्यांच्या बोगस प्रवेशांवर नियंत्रण आणि सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांची अंतर्गत कामकाजाची प्रणाली एकसमान होणार आहे. त्यासाठी राज्य सरकार आता एकसंध संगणक प्रणाली उपलब्ध करून देणार आहे. उच्च शिक्षण विभागाने या संबंधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांतील सर्व महाविद्यालयांना पत्र पाठविले आहे. कोणत्याही महाविद्यालयाने प्रवेश वा अंतर्गत कामकाजासाठी संगणक प्रणाली तयार करण्यास निविदा प्रक्रिया राबवू नये, अशा सूचना या पत्राद्वारे दिल्या आहेत. तसेच सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करावयाचे असल्याचे त्यात नमूद केले आहे. 

याबाबत सहसंचालक डॉ. विजय नारखेडे म्हणाले, ‘‘एकसंध संगणक प्रणाली मोफत मिळणार की त्यासाठी शुल्क असेल, याबाबत शासन स्तरावर निर्णय होईल.’’

‘सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ’
‘‘प्रा ध्यापकांना यापुढे सेवानिवृत्त होतील, त्याच दिवशी त्यांना निवृत्ती वेतनासह सर्व देय लाभ दिले जातील,’’ अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.

एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. पी. कुलकर्णी हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना निरोप देण्यात आला. त्या प्रसंगी तावडे बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, पूना गुजराती केळवणी शिक्षण मंडळाचे विश्‍वस्त किरीटभाई शहा, सचिव हेमंत मणियार, हरिभाई शहा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, माजी प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे आदी या वेळी  उपस्थित होते. अनेक महिन्यांपासून प्रलंबित नव्या विद्यापीठ कायद्याच्या मंजुरीबाबत तावडे म्हणाले, ‘‘हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर होईल. त्यानंतर मार्च महिन्यात अधिसभा आणि अन्य अधिकार मंडळांच्या निवडणुका होतील.’

Web Title: fyjc admission fully online