G20 : जी 20 परिषदेच्या पार्श्‍वभुमीवर महापालिकेकडून शनिवारी सायकल रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 G20 Council cycle rally by Municipal Corporation on Saturday citizens participate employees of municipal corporation

G20 : जी 20 परिषदेच्या पार्श्‍वभुमीवर महापालिकेकडून शनिवारी सायकल रॅली

पुणे : शहरात होणाऱ्या जी 20 परिषदेच्या बैठकीच्या पार्श्‍वभुमीवर महापालिकेकडून शनिवारी (ता. 10 ) सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरीकही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

शहरामध्ये दुसऱ्या टप्प्यावरील जी 20 परिषदेअंतर्गत 12 ते 14 जुन या कालावधीमध्ये बैठक होत आहे. त्यानिमित्त पुणे महापालिकेच्या सायकल क्‍लबच्यावतीने सायकल रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीला महापालिका भवनापासून सकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे.

महापालिका भवन ते मॉडर्न कॅफे, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक मार्गे टिळक रस्ता, अभिनव महाविद्यालय, बाजीराव रस्ता, पुणे महापालिका या मार्गाने सायकल रॅली जाणार आहे. या रॅलीमध्ये महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरीकही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सहभागी नागरीकांना जी 20 टि शर्ट, टोपी, मेडल देण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये अधिकाधिक नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. https://bit.ly/G20CycleRally या लिंकवर जाऊन नागरीकांना रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करता येणार आहे.

टॅग्स :cycle rally