गदिमांच्या लघुकथा आता इंग्रजीतही! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे - वाचकांना भावलेल्या साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या लघुकथा आता इंग्रजी भाषेतील वाचकांसाठीही उपलब्ध होणार आहेत. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 14 डिसेंबरला या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होणार आहे. 

पुणे - वाचकांना भावलेल्या साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या लघुकथा आता इंग्रजी भाषेतील वाचकांसाठीही उपलब्ध होणार आहेत. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 14 डिसेंबरला या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

गदिमा साहित्य कला अकादमी व प्रा. उल्हास बापट यांच्यातर्फे गदिमांच्या निवडक 14 मराठी कथांचे इंग्रजी भाषेत रूपांतर केले आहे. त्या "सिलेक्‍ट शॉर्ट स्टोरीज ऑफ जी. डी. माडगूळकर' या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध होतील. गदिमा स्मृती सोहळ्यात या पुस्तकाचे प्रकाशन होईल. सिनेमातला माणूस, वेडा पारिजात, औंधचा राजा, श्रीगुरुचरित्राचा ग्रंथ, कृष्णाची करंगळी, अधांतरी, नेम्या, पंतांची किन्हई, सगुणा, शास्त्रज्ञ एक स्त्री आणि एक कुत्रे, मन हे ओढाळ गुरू, माणूस अखेर माणूस आहे, वासना, व्यथा या निवडक 14 कथांचा त्यात समावेश आहे. गदिमांच्या शताब्दीनिमित्त "गदिमा साहित्य कला अकादमी'चा हा पहिला उपक्रम आहे. प्रा. विनया उल्हास बापट यांनी पुस्तकाचा मराठीतून इंग्रजीत अनुवाद केला आहे. तसेच, "वाटेवरच्या सावल्या' या गदिमांच्या आत्मचरित्राचेही त्या इंग्रजीत रूपांतर करीत आहेत. 

मराठी वाचता न येणाऱ्या इंग्रजी माध्यमात शिकलेल्या रसिकांसाठी व इतर भाषिक लोकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. गदिमांच्या पुष्कळशा कथा या जागतिक दर्जाच्या असून, त्या इंग्रजी भाषेत गेल्या तर जागतिक दर्जाच्या या लेखकाची प्रतिमा प्रातांच्याच नव्हे तर देशाच्याही सीमा ओलांडून तेथील रसिकांच्या प्रेमाला पात्र होईल, याची खात्री असल्यामुळेच त्यांचे इंग्रजीत भाषांतर केले आहे. आपल्याला गीतरामायण लवकरच हिंदीत वाचता येणार आहे. "सिलेक्‍ट शॉर्ट स्टोरीज ऑफ जी. डी. माडगूळकर'चे ई-बुकही उपलब्ध असेल. 
- सुमित्र माडगूळकर , विश्‍वस्त, गदिमा साहित्य कला अकादमी 

Web Title: Ga. Di. Madgulkar Short story now in English