शिकवताना विद्यार्थ्यांना सक्षम करण्यावर भर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पुणे - मौखिक परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाचा मोठा खजिना भारतात आहे. २१ व्या शतकात फक्त संज्ञापनाची माध्यमे व तंत्रज्ञान बदलले आहे; पण तंत्रज्ञान म्हणजे शिक्षक नव्हे. शिकवताना विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने आम्ही शिकवतो. अमेरिकेत विद्यार्थ्यांचा हिंदी शिकण्यामागचा उद्देश, गरजा व त्यांच्या क्षमता लक्षात घेऊन शिकवण्यावर आम्ही भर देतो, असे न्यूयॉर्क विद्यापीठातील हिंदी भाषेच्या प्राध्यापिका गॅब्रिएला निक इलेवा यांनी आज सांगितले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हिंदी विभाग व ‘हिंदी संगम फाउंडेशन’ (भारत /अमेरिका) यांच्यातर्फे ’२१ वीं सदी में हिंदी शिक्षण के नए आयाम’ या विषयावर आयोजित दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाचे उद्‌घाटन विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील सभागृहात झाले. या वेळी प्रा. गॅब्रिएला यांनी बीजभाषण केले. 

याप्रसंगी आकाशवाणीचे माजी संचालक डॉ. लीलाधर मंडलोई, विद्यापीठ प्रबंधन परिषदेचे सदस्य प्रसेनजीत फडणवीस व राजेश पांडे यांनी विचार मांडले. 

विभागप्रमुख प्रा. सदानंद भोसले यांनी स्वागत व संमेलन संयोजक डॉ. महेश दवंगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनील देवधर यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. डॉ. शशिकला राय यांनी आभार मानले. या वेळी मंडलोई म्हणाले, ‘‘शिकवण्याचे शास्त्र असले तरी ती एक कला आहे. पुस्तकी माहितीतून केवळ सिद्धांत कळतात. जे शिकवायचे त्याचा आत्मा चिंतनाने शोधावा लागतो आणि तो इतरांना परिणामकारकपणे शिकवण्यासाठी कौशल्य विकसित करावे लागते.’’ ‘वैश्वीकरण के परिप्रेक्ष्य में हिंदी शिक्षण’ या विषयावरील चर्चासत्रात मास्को विद्यापीठातील हिंदीच्या प्रा. डॉ. सफरमो तोलिबी, डॉ. दामोदर खडसे, डॉ. करुणाशंकर उपाध्याय, डॉ. किशोर वासवानी व डॉ. सर्वेश मौर्य आदी सहभागी झाले. डॉ. तोलबी यांनी रशियातील अनुभव सांगितले. 

त्या म्हणाल्या, ‘‘जगभर हिंदी शिकणाऱ्या अभारतीय लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. आपला देश, संस्कृती व भाषा म्हणजेच आपली ओळख असते.’’ डॉ. राजेंद्र घोडे यांनी आभार मानले.

Web Title: gabriella eliva Talking Teaching Student Education