गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना साहित्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजातील विविध क्षेत्रांतील नामवंतांची तुला करून या तुलेतील शैक्षणिक साहित्य गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना देऊन शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळकृत विघ्नहर्ता वाद्यपथकातील वादकांनी सामाजिक भान जपले आहे.

पुणे - आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजातील विविध क्षेत्रांतील नामवंतांची तुला करून या तुलेतील शैक्षणिक साहित्य गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना देऊन शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळकृत विघ्नहर्ता वाद्यपथकातील वादकांनी सामाजिक भान जपले आहे.

विघ्नहर्ता वाद्यपथकातर्फे सेवा मित्र मंडळ चौकात समाजसेवक विजयराज फळणीकर, शहीद मेजर शशीधरन नायर यांच्या वीरमाता लता नायर, ज्येष्ठ ताशावादक राजन घाणेकर या मान्यवरांची शालेय साहित्याची तुला करण्यात आली आणि हे शैक्षणिक साहित्य गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. 

या वेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, खडक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, सदाशिव कुंदेन, ॲड. शिरीष शिंदे, इक्‍बाल दरबार, शाहीर हेमंत मावळे, कुमार रेणुसे, सागर पवार, अतुल बेहेरे, विघ्नहर्ता पथकाचे कार्याध्यक्ष 
कैलास धायगावे, विघ्नहर्ता पथकातील वादक ॲड. वृषाली मोहिते-जाधव, विराज मोहिते आदी उपस्थित होते. 

या वेळी वाद्यपथकातील सरावाचा वाद्यपूजन करून शुभारंभ करण्यात आला. पोलिस निरीक्षक चक्रे यांनी मनोगत व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadchiroli Student Educational Equipment Vighnaharta Vadyapathak Motivation