गाडीखेल होणार फळबागांचे गाव

संतोष आटोळे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

शिर्सुफळ : बारामती एमआयडीसी मधील पियाजीओ व्हेईकल्स कंपनीच्या सामाजिक बांधिलकी निधीतुन संजीवनी सक्षमीकरण व विकास संस्था औरंगाबाद यांच्या मार्फत गाडीखेल येथील ग्रामस्थांना आंबा , सीताफळ, चिकू, पेरू व लिंबूची रोपे उपलब्ध करून देण्यात आली.यामुळे आगामी काळात गाडीखेल फळबागांचे गाव म्हणुन ओळखले जाईल.

बारामती तालुक्यातील पारवडी, कटफळ, गाडीखेल, सावळ, येथे पियाजो व्हेईकल्स कंपनीच्या सीएसआर निधीतून  जरसंधारणासह शैक्षणिक कामे हाती घेण्यात आली आहे.याचाच एक भाग म्हणुन गाडीखेल गावातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या फळझाडांची  रोपे उपलब्ध व्हावी यासाठी कंपनीने पुढाकार घेतला आहेत.यानुरुप गावातील 50 शेतकऱ्यांना  तब्बल 4200 आंबा , सीताफळ , चिकू,  पेरू व लिंबू या रोपांचे वाटप करण्यात आले. 

सदर रोपांचे वाटप सरपंच बाळासाहेब आटोळे, उपसरपंच नानासाहेब जगताप, पियाजियो व्हेईकल्स चे व्यवस्थापक योगेश कापसे, संजीवनी संस्थेचे व्यवस्थापक हरिभाऊ नागरे,  प्रकल्प समन्वयक आप्पासाहेब बोडखे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य शरद शेंडे, दिलिप आटोळे मच्छिंद्र आटोळे, मोहन पोमणे, विलास दळवी, विश्वास आवदे, दादा आटोळे, ज्ञानदेव जगताप कृषी विभागाचे कुंभार व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
 
Web Title: gadikhel village become fruits village