गहुंजे ते उर्सेदरम्यान ‘हायपरलूप डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पुणे - व्हर्जिन हायपरलूप या कंपनीकडून पुणे- मुंबई रस्त्यावरील गहुंजे ते उर्से टोलनाका दरम्यान सुमारे ११.४ किलोमीटर लांबीचा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर ‘डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’ उभारण्यासाठी निवडला आहे. या मार्गासाठी पीएमआरडीएकडून लवकरच भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे. 

या डेमॉन्स्ट्रेशन टृॅकसह १४४ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या कमिटीकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. पुढील महिन्यात या कमिटीची बैठक होणार आहे. त्यामुळे मेट्रोपाठोपाठ आता हायपरलूप प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएने कार्यवाही सुरू केली आहे.

पुणे - व्हर्जिन हायपरलूप या कंपनीकडून पुणे- मुंबई रस्त्यावरील गहुंजे ते उर्से टोलनाका दरम्यान सुमारे ११.४ किलोमीटर लांबीचा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर ‘डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’ उभारण्यासाठी निवडला आहे. या मार्गासाठी पीएमआरडीएकडून लवकरच भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे. 

या डेमॉन्स्ट्रेशन टृॅकसह १४४ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या कमिटीकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. पुढील महिन्यात या कमिटीची बैठक होणार आहे. त्यामुळे मेट्रोपाठोपाठ आता हायपरलूप प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएने कार्यवाही सुरू केली आहे.

सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील क्रांती समजला जाणारा हायपरलूप हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय पीएमआरडीएने (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) घेतला आहे. त्यासाठी व्हर्जिन हायपरलूप कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. हा ट्रॅक पुणे- मुंबई महामार्गावर उभारण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

त्यासाठी संबंधित कंपनीला पूर्वव्यवहार्यता पडताळणी अहवाल (प्री फिजिबिलिटी रिपोर्ट) सादर करण्यात आला होता. त्यास राज्य सरकारनेही मान्यता दिली आहे. संबंधित कंपनीकडून फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याचे काम देण्यात आले होते. त्यासाठी कंपनीला ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. कंपनीकडून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो राज्य सरकारकडे मान्यतेला पाठविण्यात आला होता. त्यास गेल्याच महिन्यात राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली.

या प्रकल्पाला सुरक्षितता आणि अन्य तांत्रिकदृष्टीने मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधान वैज्ञानिक सल्लागार समिती नेमली आहे. या समितीकडे राज्य सरकारकडून ड्रेमॉन्स्ट्रेशन ट्रकसह पुणे-मुंबई मार्गावर हायपरलूप उभारण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यात डेमॉस्ट्रेशन ट्रॅकचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

जगातील हा पहिला ‘डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’ असणार आहे. त्यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा सर्व खर्च संबंधित कंपनी करणार आहे. या कंपनीकडून अमेरिका, रशिया व दुबईत हायपरलूप प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. मात्र तेथे टेस्टिंग ट्रॅक उभारण्याचे काम सुरू आहे. ते जास्तीत जास्त पाचशे मीटर लांबीचे आहेत. त्यापैकी काही ठिकाणी हायपरलूपचा वापर माल वाहतुकीसाठी करण्यात येणार आहे. 

‘पीएमआरडीए’च्या क्षेत्रात हा प्रकल्प मात्र प्रवासी वाहतुकीसाठी राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जगात हायपरलूप या अतिवेगवान सार्वजनिक वाहतूक प्रकल्पातून प्रवास करण्याचा मान सर्वप्रथम पुणेकरांना मिळणार आहे.

व्हर्जिन हायपरलूप या कंपनीकडून व्यवहार्यता पडताळणी अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये गहुंजे ते उर्से दरम्यान डेमॉन्स्ट्रेशन ट्रक दर्शविण्यात आला आहे. त्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. पुढील महिन्यात बैठक असून त्यास मान्यता मिळाल्यानंतर लगेच कामाला सुरवात करण्यात येणार आहे.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

‘एक्‍स्प्रेस वे’ला समांतर ट्रॅक
हायपूर लूपचा ‘डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’ हा ११.४ किलोमीटर लांबीचा असणार आहे. ट्रॅक १४ मीटर रुंदीचा, तर दहा मीटर रुंदीचा सर्व्हिस रोड असा मिळून सुमारे २४ मीटरचा ट्रॅक असणार आहे. ही सर्व जमीन खासगी मालकीची आहे. गहुंजे येथील टाउनशिपच्या मागील बाजूपासून तो उर्से टोलनाक्‍याच्या पुढे दोन किलोमीटरपर्यंत असणार आहे. एक्‍स्प्रेस वेला हा ट्रॅक समांतर असणार आहे. भविष्यात तो पुणे- मुंबई मार्गावर उभारण्यात येणाऱ्या हायपरलूपला जोडण्यात येणार आहे.

Web Title: Gahunje to Urse Hyperloop Demonstration Track