विद्यार्थ्यांचे सोप्या भाषेत शंकानिरसन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पुणे - ग्रहण म्हणजे सावल्यांचा खेळ; पण तो नेमका कसा होतो? पृथ्वीच्या आधी या ब्रह्मांडामध्ये काय होतं? असे प्रश्‍न लहान मुलांना हमखास पडतात... याची उत्तरं कधी पालक, तर कधी शिक्षक आपापल्या परीनं देतात. पण, या प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी दिली तर... तीही अगदी सहजसोप्या भाषेत... किती मजा येईल ना! नेमका हाच आनंद रविवारी ‘गंमतघर’मध्ये सहभागी मुलांना मिळाला. 

‘गंमतघर’मधील तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. नारळीकर आणि त्यांच्या पत्नी गणिततज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांच्याशी संवाद साधला. लहान मुलांना सहजपणे पडणाऱ्या भौगोलिक प्रश्‍नांची उत्तरे डॉ. जयंत नारळीकर यांनी दिली. 

गणित हा मुलांसाठी खरंतर नावडीचा विषय. मोठ्या संख्येची आकडेमोड करणे ही त्यांच्यासाठी डोकेदुखी असते. पण, ही डोकेदुखी न वाटता त्यात गोडी निर्माण करण्याचे ‘सूत्र’ डॉ. मंगला नारळीकर यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने दिले. त्या म्हणाल्या, ‘‘बालभारती पाठ्यपुस्तकातील उदाहरणे सोडविल्यास कोणत्याही क्‍लासशिवाय चांगले गुण मिळू शकतात. कोणत्याही पद्धतीने गणित सोडवले तरी उत्तर एकच असते. फक्त आकडेमोड नीट केली पाहिजे.’’ 

आकाशाचा रंग निळाच कसा? गुरुत्वाकर्षणाचे नियम, दीर्घिका, ग्रहण आदींबाबत डॉ. जयंत नारळीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

भाषा आणि विज्ञानातील आवड लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी आणि विज्ञानातील गमती-जमती शिकत त्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्याच्या उद्देशाने ‘गंमतघर’ हा उपक्रम महिन्यातून दोन वेळा राबविला जातो. यानिमित्ताने मुलांना या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद साधता येतो, असे तांबे यांनी सांगितले. योगेश ढगे, तन्वी कुलकर्णी, मनीषा मुळे आणि सुप्रीती ढगे या वेळी उपस्थित होते.

Web Title: Gammatghar Student Easy Language