अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीला गणेश भक्तांची गर्दी

दत्ता म्हसकर
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

जुन्नर - आज मंगळवार ता. २५ डिसेंबर अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग व नाताळची सुट्टी यामुळे अष्टविनायक 'श्री क्षेत्र लेण्याद्री' येथे श्री गिरीजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात लाखो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.

जुन्नर - आज मंगळवार ता. २५ डिसेंबर अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग व नाताळची सुट्टी यामुळे अष्टविनायक 'श्री क्षेत्र लेण्याद्री' येथे श्री गिरीजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात लाखो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.

पहाटे ४ वाजता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष कैलास लोखंडे यांच्या हस्ते अभिषेक व महाआरती करण्यात आली.  यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्रशेठ शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते. 

श्री गिरिजात्मजकाच्या मूर्तीस,गाभाऱ्यात व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी ६:०० वाजता व दुपारी १२:०० वाजता महाआरती करण्यात आली. देवस्थान ट्रस्ट मार्फत भाविकांना विविध सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या. अन्नदानाकरीता पुणे येथील सौ.सुमती पद्माकर अत्रे यांनी रक्कम एक लाख एक रुपयांची देणगी दिली. आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळ यांनी मंदीर परीसरात साफ सफाई करुन श्रमदान केले. सायंकाळी मंदिरात श्री मुक्ताई भजनी मंडळ, शिवेची वाडी यांचे भजन झाले. चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली यावेळी मोठया संख्येने भाविक उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. 

दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी सकाळी व सायंकाळी गर्दी केली होती. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जुन्नर व जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक वाहनांनी श्रींच्या दर्शनासाठी येत होते. देवस्थान मार्फत भाविकांसाठी सुलभ दर्शन व्हावे म्हणुन दर्शन मार्गावर गृहरक्षक दलाचे जवान नियोजन व्यवस्था करत होते.अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

Web Title: Ganesh devoted crowd of devotees on the occasion of Angarak Samashti Chaturthi