गणेशमूर्ती विक्री व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी घेतला 'हा' निर्णय 

gan.jpg
gan.jpg

बालेवाडी : श्रावण  महिना लागला की घराघरातून वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे. पण यावर्षी कोरोनाचे संकट एवढे मोठे आहे की बाप्पा आपल्या घरी येणार की नाही? असा प्रश्न बच्चे कंपनींना पडला आहे. तर घरातील मोठी माणसं या वर्षी मूर्ती कोठे मिळतील या विचारात आहेत. याच बरोबर दरवर्षी गणपती मूर्ती विक्री करणाऱ्या काही व्यावसायिकांनी पेणहून गणपती मूर्ती विक्रीस आणल्या आहेत. तर काहींनी मात्र कोरोनामुळे यावर्षी गणपती बाप्पांच्या विक्रीचे स्टॉल्स न लावण्याचा निर्णय घेतला. तर काहींनी मात्र हताश न होता ऑनलाईन गणपतींचे बुकिंग सुरू करून घरपोच गणेश मूर्ती पोहोचविण्याचा पर्याय निवडला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान या संदर्भात आता सध्या सोशल मीडियावर  जाहिराती झळकू लागल्या आहेत. गणेशोत्सव म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता उत्सव. हा उत्सव काही दिवसांवर आला असून, लहान मुलांच्या कानावर सतत कोरोनाची चर्चा पडत आहे, त्यामुळे आपले लाडके बाप्पा घरी येणार की नाही? हा प्रश्न सतावतो आहे. तर दरवर्षी प्रमाणे आधीच काही दिवस आपली आवडणारी मूर्ती आरक्षित करता येईल की नाही, यावर्षी गणपतीच्या मूर्तीचे स्टॉल लागतील की नाही? गणपतीच्या मूर्ती कुठून खरेदी करायच्या? हा प्रश्न वडीलधाऱ्यांना सतावतो आहे.

शहर भागातील काही व्यवसायिकांनी दरवर्षी प्रमाणे पेणहून मूर्ती मागविल्या आहेत. पण कोरोनामुळे मूर्तीना यावर्षी कसा उठाव असेल हे माहीत नसल्यामुळे कमी प्रमाणामध्ये मूर्ती मागविल्या आहेत. तर काही व्यावसायिकांनी मात्र काही भागात प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यामुळे गणपती विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही व्यवसायिकांनी मात्र हताश न होता या कोरोनाच्या काळात ऑनलाईन गणेशमूर्तींचे बुकिंग सुरू करून घरोघरी गणेश मूर्ती पोचविचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सोशल मीडिया वरती जाहिरातीही येऊ लागल्या आहेत. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com