थेऊरमध्ये लाडक्या बाप्पाची जंयती उत्साहात साजरी; भाविकांची दर्शनासाठी गर्दी

Ganesh Jayanti celebration in Theur today
Ganesh Jayanti celebration in Theur today

उरुळी कांचन (पुणे) - लहानापासून ते वडीलधार्‍या सर्वांचाच लाडका गणपती बाप्पांची  आज(ता.15) जयंती. पूर्व हवेलीत मोठ्या थाटामाटात बाप्पाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अष्टविनायकांपैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याची माहिती चिंचवड देवस्थानचे विश्वस्त आंनद तांबे यांनी दिली. 

टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्यातील मंत्री अडचणीत ?

सोमवारी पहाटे सुधीर आगलावे यांनी श्रींची पूजा करून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटेपासून धार्मिक विधी व जन्मकाळ सोहळ्यास सुरुवात झाली. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच देवस्थानच्या वतीने पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहांची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी पूर्वपरंपरेनुसार पिरंगूटकर देव व ऊरुळीकर देव याच्याकडून महापूजा करण्यात आली. संध्याकाळी श्रींचा छबिना काढण्यात आला होता. 

पूर्व हवेलीतील ऊरुळी कांचन (ता. हवेली ) येथील आश्रम रोडवरील गणपती मंदिरात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जन्मकाळ सोहळा पार पडला. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. कोहिनूर मित्र मंडळाच्या वतीने महावीर निवासी मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पुस्तकांचे वाटप करण्यात आले.  

कोण आहे टिक-टॉक स्टार पुजा चव्हाण?

दरम्यान ऊरुळी कांचन येथील महात्मा गांधी तरुण मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, अनुपम मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, नव आझाद मित्र मंडळ, अखिल तळवाडी मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, भोलेनाथ मित्र मंडळ, श्रीमंत वीर तरुण मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, नवचैतन्य मित्र मंडळ, अचानक मित्र मंडळ, या मंडळांनी कोरोंनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी सरकारने जी नियमावली आयोजित केली होती त्या नियमावलीत राहूनच गणेश जयंती साजरी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com