esakal | गणेश मंडळांनी जेवणावळी टाळाव्यात; पोलिस अधिकारी सोमनाथ लांडे
sakal

बोलून बातमी शोधा

Somnath Lande

गणेश मंडळांनी जेवणावळी टाळाव्यात; पोलिस अधिकारी सोमनाथ लांडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सुपे - गणपती मंडळांनी (Ganpati Mandal) परवानगी (Permission) काढून, कोरोनाचे सर्व नियम पाळून धार्मिक, सामाजिक कार्यक्रम करावेत. पार्सल सेवेद्वारे भाविकांना प्रसाद द्यावा. अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सोमनाथ लांडे (Somnath Lande) यांनी दिली.

सुपे (ता.बारामती) येथे मंडळांचे प्रमुख कार्यकर्ते, पोलीस पाटील व गणेशमुर्ती विक्रेते यांच्या घेतलेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या पोलीस ठाण्याच्या अखत्यारितील ६२ गावात मिळून सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणारी २१२ मंडळे आहेत. गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकांना परवानगी नाही. जेवणावळी नको. वीज आकडे टाकून घेऊ नका. वाहतूकीला अडथळा ठरेल अशी जागा नको.

हेही वाचा: पुणे: डीएसके कार प्रकरण; ४३ लाखांची फसवणूक

जागेसाठी खाजगी असल्यास संबंधितांची व ग्रामपंचायतीची अधिकृत परवानगी घ्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुर्ती व परिसर सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी मर्यादित आवाजात ध्वनीक्षेपक लावता येईल. धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी सुरक्षित अंतर पाळा, मास्क व सॅनिटायझरचा वापर करा. उत्सव काळात आरती, प्रवचन, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रक्तदान, आरोग्य प्रबोधन, मास्क, सॅनिटायझर वाटप असे सामाजिक कार्यक्रम घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जेवणावळीमुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आल्याने जेवणावळी टाळा. त्याऐवजी पार्सल पद्धतीने भाविकांना प्रसाद द्या. मंडळांनी साडेचार फुटांपेक्षा मोठ्या मुर्ती बसवू नयेत. मुर्ती दोन दिवस आधीच न्यावी. गणपती विक्री स्टॉलमध्ये अंतर असावे. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. आदी सुचना श्री.लांडे यांनी यावेळी दिल्या. या वेळी पोलीस उपनिरिक्षक एस.जी.शेख उपस्थित होते.

loading image
go to top