मंडपासाठी मंडळांचे ऑनलाइन अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

गणेशोत्सवासाठी ७९२ मंडळांनी मंडप घालण्याची परवानगी मागणारे ऑनलाइन अर्ज शुक्रवारी केले आहेत. त्यापैकी ३०२ मंडळांना परवानगी मिळाली आहे. १६ ऑगस्टपर्यंतच मंडळांना अर्ज करता येणार आहेत. 

पुणे - गणेशोत्सवासाठी ७९२ मंडळांनी मंडप घालण्याची परवानगी मागणारे ऑनलाइन अर्ज शुक्रवारी केले आहेत. त्यापैकी ३०२ मंडळांना परवानगी मिळाली आहे. १६ ऑगस्टपर्यंतच मंडळांना अर्ज करता येणार आहेत. 

दोन वर्षांपासून पुणे महापालिका आणि पोलिसांकडून ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज देण्याची सुविधा दिली आहे. परंतु, यंदापासून फक्त ऑनलाइन अर्ज घेतले जात आहेत. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) वाहतूक पोलिस, महापालिका आणि संबंधित पोलिस ठाणे यांच्यासाठी एकच अर्ज भरून तो सबमिट करावा लागतो. वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले की मग महापालिका एनओसी देते. यानंतर पोलिस ठाण्याकडून एनओसी मिळते. आजपर्यंत ७९२ मंडळांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी ५५६ मंडळांना वाहतूक पोलिसांची एनओसी मिळाली आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांनी ६३२ जणांना मंजुरी देऊन ४७९ अर्ज स्थानिक पोलिस ठाण्यांकडे पाठविले आहेत. तर ३०२ मंडळांना तिन्ही ठिकाणच्या एनओसी मिळाल्याने त्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ७५ मंडळांनी दोनदा अर्ज केले होते. त्यातील एक अर्ज बाद  केला आहे. 

‘‘मंडळांना परवाने दिल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करायची असल्याने १६ ऑगस्टपर्यंतच परवानगी दिली जाणार आहे. मंडळांच्या सोयीसाठी शनिवार (ता. १०), रविवारी (ता. ११) आणि सोमवारी (ता. १२) या सुटीच्या दिवशीही परवाने देण्यात येणार आहेत,’’ असे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh mandal online application