साबळेवाडीच्या उपसरपंचपदी गणेश साबळे

संतोष आटोळे 
सोमवार, 23 जुलै 2018

शिर्सुफळ - साबळेवाडी (ता.बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी गणेश साबळे यांची बिनविरोध निवड झाली.

नवनिर्वाचित सरपंच गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच सभेत उपसरपंच निवड प्रक्रियेमध्ये निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी गणेश साबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यामुळे साबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार आर.सी.पाटील यांनी जाहिर केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन गाव कामगार तलाठी टिळेकर, व ग्रामसेवक प्रदिप बनसुडे यांनी काम पाहिले.

Web Title: Ganesh Sable, the upaPanchpanch of Sahevalwadi