ओतूरमध्ये विसर्जन मिरवणूक शांततेत

पराग जगताप
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

ओतूर : ओतूर (ता.जुन्नर) येथे शहरातील व परीसरातील सर्व गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका शांततेत व वेळेत निर्विघ्नपणे डीजेमुक्त पार पडल्याची माहीती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सुरज बनसोडे यानी दिली.

ओतूर व परिसरात ओतूर पोलीसा कडुन विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचीत प्रकार घडू नाही म्हणुन 3 अधिकारी,22 पोलीस कर्मचारी, 18 होमगार्ड व ग्रामरक्षक दल, 15 विशेष पोलिस अधिकारी नियुक्त करुन चोख बंदोबस्त तैनाद करण्यात आला होता.

दुपारी ओतूर शहरातील विसर्जन मार्गावरील चैतन्य रोड वरील अतुल ड्रेसेस या दुकानाची मातीची मोठी भिंत कोसळली. सुदैवाने या परिसरात त्यावेळी कोणतीही मिरवणुक नसल्याने मोठा अनर्थ टळला. भिंत पडल्याची समजताच सरपंच बाळासाहेब घुले, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, सहायक पोलिस निरिक्षक सुरज बनसोडे यानी घटनास्थळी भेट देऊन पहाणी वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच या परिसरातून शांततेत मिरवणुका पुढे न्याव्या अशा सूचना बनसोडे यांनी दिल्या.

ओतूर पोलीस ठाणे हद्दीतील गावा मधील 69 सार्वजनीक व ओतूर शहरातील सर्व 10 सर्व गणेश मंडळाचे विसर्जन मिरवणुका पारंपारीक वाद्यात व शांततेत पार पडल्या रात्री 11.55 वाजता सर्वात शेवटी वरच्या आळी येथील नवोदित गणेश मंडळाच्या श्री च्या मुर्तीचे विसर्जन झाले. त्यांच्याकडुन  गणपती बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीसाना तंदुरुस्त बंदोबस्तसाठी फूड पॉकेटचे वाटप करण्यात आले होते.

Web Title: ganesh visarjan in peace in otur