Ganesha idol of Shadu in Kothrud Ganeshotsav pune
Ganesha idol of Shadu in Kothrud Ganeshotsav punesakal

शाडूच्या गणेशमूर्ती कोथरूडमध्ये दाखल

कोरोना निर्बेंधानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा होत असल्याने यंदाचा उत्सव नेहमीपेक्षा जास्त उत्साही असेल

कोथरुड : श्रीं च्या आगमनाला अजून अवधी असला तरी भाविकांकडून मूर्तींची नोंदणी खूप आधीपासून करण्यात येते. याचाच विचार करून दरवर्षीच पेणमधील पर्यावरणपूरक शाडू मातीच्या सुबक गणेश मूर्ती कोथरूड मध्ये आधीच येतात. कोरोना निर्बेंधानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा होत असल्याने यंदाचा उत्सव नेहमीपेक्षा जास्त उत्साही असेल असा कयास आहे. यंदाच्या वर्षी ही वाहतूक खर्च आणि रंगांच्या किंमती वाढल्यामुळे गणेशमूर्तींची किंमत ही वाढणार आहे. सजावट, महिरप, तसेच कोणत्या रुपातला बाप्पा घरी न्यायचा याबद्दल भाविक अगोदरच आडाखे ठरवत असतात. नागरिकांची आवड व उत्सुकता लक्षात घेवून विक्रेतेसुध्दा दुकानात नाविन्य व आकर्षण निर्माण करतात.

आनंदनगरमधील संसार जनरल स्टोअर्सचे सुबोध महाजन म्हणाले की, गणेशोत्सवाच्या दीड दोन महिने आधीच आमच्याकडे मुर्ती येतात. यंदा ही हीच परंपरा राखत गणेशमूर्तींची पहिली गाडी दाखल झाली आहे. शाडू मातीच्याच मूर्तींची विक्री करण्याचे यंदाचे ३५ वे वर्ष आहे. परदेशात स्थायिक झालेले भाविक ही आपल्याबरोबर येथूनच श्रीं च्या मूर्ती बरोबर घेऊन जातात.. परमहंसनगरमधील आर के सिझनलचे सीतारामा खाडे म्हणाले की, पर्यावरण विषयक संवेदनशीलता व शासनाचे नियम लक्षात घेवून यंदा शाडूच्या मुर्तींना मागणी वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com