वाघोलीतील अष्टविनायक मित्र मंडळाकडून 15 गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

Cycle-Distribution
Cycle-Distribution

वाघोली - वाघोलीतील अष्टविनायक मित्र मंडळाने गणेश विसर्जन मिरवणूक व इतर खर्च टाळून व्ही. एस. सातव विद्यालयातील 15 गरजू विद्यार्थ्यांना सायकली, 100 विद्यार्थ्यांना फळझाडांचे वाटप केले. तसेच आठ गरीब विद्यार्थ्यांचे पालकत्व घेतले.

वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, सदस्य शिवदास उबाळे, एन के निंबाळकर यांच्या हस्ते सायकल व फळझाडांचे वाटप करण्यात आले. दरवर्षी मंडळ वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढते. मात्र हा खर्च टाळून विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय मंडळाच्या पद्धधिकार्यांनी घेतला. हे पदाधिकारी शाळेचे माझी विद्यार्थी आहेत. त्यांच्या या समाजोपयोगी व स्तुत्य उपक्रमाबाबत वाघोली ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे प्राचार्य टी के वाघचौरे यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com